कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

वर्षाला 25 लाख खर्च करूनही भटकी कुत्री नियंत्रणाबाहेर

04:42 PM Aug 05, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

कोल्हापूर / इम्रान गवंडी :

Advertisement

कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात भटक्या व पाळीव कुत्र्यांच्या हल्ल्यात दिवसेंदिवस वाढच होत आहे. महापालिकेकडून वर्षाला भटक्या कुत्र्यांच्या निर्बिजीकरण व लसिकरणासाठी 25 लाख रूपये खर्च केले जात आहेत. तरीही भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रणाबाहेर जात आहे. रोज सरासरी 40 ते 50 जण कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी होत असुन सीपीआर हॉस्पिटलमध्ये वर्षाला आठ हजार रेबीजच्या वॅक्सिन खर्च होत आहेत.

Advertisement

या वर्षात कुत्र्यांच्या हल्ल्यात 20 हजार 926 जणांचे भटक्या कुत्र्यांनी लचके तोडले आहे. कुत्रे चावल्यानंतर दुर्लक्ष झाल्यास रेबीजचा धोका संभव असतो. मागील दोन वर्षात रेबीजची लागण झाल्यामुळे सात जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये एका युवक-युवती, एक बालक व अन्य चौघांचा समावेश आहे. भटक्या कुत्र्यांच्या निर्बिजीकरणासाठी महापालिकेच्यावतीने वर्षाकाठी लाखो रूपये खर्च केले जातात. मात्र, वाढत्या कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण मिळविण्यात प्रशासनाला अपयश येत आहे. महापालिकेसह जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी सहभागी होऊन मोहिम तीव्र करण्याची गरज निर्माण झाली आहे.

शहरासह जिल्ह्यात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात वाढ होत आहे. सीपीआरमध्ये रोज कुत्री, मांजरांच्या हल्ल्यात जखमींना रेबीजची लस द्यावी लागते. वर्षाला किमान आठ हजार रेबीजचे बल्ब (वॅक्सीन) खर्ची होत आहेत. यासाठी लाखो रूपये मोजावे लागत आहेत.

महिन्याला सरासरी 1900 नागरिकांवर कुत्र्यांनी हल्ला केल्याचे स्पष्ट होत आहे. यामध्ये धावत्या गाडीमागे लागणाऱ्या कुत्र्याला चुकवण्याच्या प्रयत्नात अपघात होऊन अनेकांना कायमचे जायबंदी व्हावे लागले आहे. त्यामुळे भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

उपनगरात दिवसभर गल्ली बोळातून भटक्या कुत्र्यांच्या झुंडी पहायला मिळतात. ही कुत्री कधी अंगावर धावून येतील याचा नेम नसतो. त्यातच उपनगरातील स्ट्रीट लाईट बंद असल्यामुळे रात्रीच्या वेळी कुत्र्यांच्या हल्ल्याचे प्रमाण वाढले आहे.

कुत्रे किंवा मांजर चावल्याने जखम स्वच्छ करणे व डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधेपचार घेणे आवश्यक आहे. मांजराचे दात टोकदार असल्याने ते त्वचेला खोल जखम करू शकतात. मांजराच्या तोंडात अनेक जीवाणू असतात, जे जखमांतून आत जाऊन संसर्ग करू शकतात. मांजरीच्या चाव्यामुळे टेनीसायनीव्हाइटिस किंवा संधिवात होण्याची शक्यता तज्ञांनी व्यक्त केली.

महिना                 जखमींची संख्या
जानेवारी :                    1466
फेब्रुवारी :                    1598
मार्च :                          1810
एप्रिल :                        1826
मे :                             1916
जून                            1748
जूलै :                          1430
ऑगस्ट :                     1587
सप्टेंबर :                     1865
ऑक्टोबर :                 1877
नोव्हेंबर :                    1845
डिसेंबर :                    1958
एकूण :                    20926

ग्रामीण :          2
मनपा :           1
राज्यबाह्य :      3
एकूण :          7

लसिकरण व निर्बिजकरणसाठी दोन तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली पथकाची नेमणूक केली आहे. यामध्ये दोन वाहने, दोन आरोग्य निरिक्षक, 12 डॉग कॅचर यांचा समावेश आहे. शहरात कुत्र्यांच्या लसिकरणाची मोहीम तीव्रतेने सुरू आहे. महापालिकेसह विविध सामाजिक संस्थांकडून लसीकरण केले जात आहे.
                                                                                         - डॉ. विजय पाटील, पशुवैद्यकीय अधिकारी, मनपा

 

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article