महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

गडहिंग्लजच्या डिझायनरचा हुबळी अपघाती जवळ मृत्यू

02:28 PM Jan 29, 2024 IST | DHANANJAY SHETAKE
गडहिंग्लजच्या डिझायनर हुबळी जवळ मृत्यू
Advertisement

बंगळूर येथील एका खाजगी कंपनीत डिझायनर म्हणून कार्यरत असणाऱ्या आशिष वामन सुतार (वय,३३) या युवकाचा हुबळी जवळ अपघाती मृत्यू झाला आहे. याबद्दल समजलेली अधिक माहिती अशी कि, आशिष यांच्या साठी त्यांच्या घरी वधू संशोधनाचे कार्य सुरू होते. त्यानिमित्त आशिष हा बंगळूरहुन गडहिंग्लज कडे येत होता. आज दि.२९ जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास आशिष आपल्या दुचाकी वरून हुबळी नजीक आला असता त्याच्या दुचाकीला जोरदार अपघात झाला व त्यातच त्याचा मृत्यू झाला. आशिष हा बंगळूर येथील खाजगी कंपनीत सिनिअर डिझायनर स्पेशालिस्ट म्हणून कार्यरत होता. आशिष हा मूळचा कानोली ता - आजरा येथील असून गेल्या काही दिवसा पासून गडहिंग्लज शहरातील भगतसिंह रोड परिसरात राहत होता. त्यामुळे गडहिंग्लजसह कानोली परिसराला या अपघातामुळे धक्का बसला आहे. आशिष याच्या मागे आई,वडील,भाऊ,भावजय असा परीवार आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#accident #twowheelar #highway#death#news#tarunbhrat
Next Article