जीन बदलून ‘डिझाइनयर बेबी’चा होणार जन्म
दिग्गज तंत्रज्ञान कंपन्यांकडून प्रोजेक्ट
‘प्रिवेंटिव’ नावाची एक सीक्रेट कंपनी असून ती टेक जगताच्या मोठ्या अब्जाधीशांच्या मदतीने मानवी भ्रूणांच्या जीनना बदलण्याचा प्रयत्न करत आहे. याचा अर्थ ते शुक्राणू किंवा भ्रूणांच्या डीएनएमध्ये बदल करत वंशपरंपरागत आजारा संपविण्याची योजना आखत आहेत. प्रिवेंटिव कंपनीला ओपनएआयचे सॅम ऑल्टमॅन आणि कॉइनबेसचे ब्रायन आर्मस्ट्राँग यासारख्या टेक दिग्गजांचे समर्थन प्राप्त आहे. कंपनी खासगी प्रयोगशाळांमध्ये मानवी भ्रूणांच्या जीन एडिटिंगवर काम करत आहे. जीन एडिटिंगचा अर्थ डीएनएला कापून-जोडून बदलणे, यात क्रिस्पर तंत्रज्ञानाचा वापर होतोय. यामुळे आजार म्हणजेच सिकल सेल अॅनिमिया किंवा सिस्टिक फायब्रोसिस कायमस्वरुपी संपुष्टात येऊ शकते. परंतु हा बदल पुढील पिढ्यांना प्राप्त होणार आहे.
कायदेशीर परंतु नैतिक प्रश्नांचा डोंगर
अमेरिकेत खासगी प्रयोगशाळेत हे काम कायदेशीर आहे, परंतु अत्यंत वादग्रस्त आहे. छोटीशी चूक देखील पूर्ण वंशाला प्रभावित करू शकते. जीन चुकीच्या ठिकाणी कापण्यात आला तर नवे आजार निर्माण होऊ शकतात, असे तज्ञांचे सांगणे आहे. याचबरोबर हा श्रीमंत-गरीब दरीला आणखी रुंदावू शकतो. केवळ श्रीमंतच स्वत:च्या मुलांना ‘परिपूर्ण’ करू शकतील, तर गरीबांना त्याच जुन्या समस्या झेलाव्या लागतील.
डिझायनर बेबीजचा काळ नजीक
प्रिवेटिंव सोबत जगभरातील अनेक कंपन्या भ्रूणांची तपासणी करत आहेत. डोळ्यांचा रंग किंवा आयक्यू सारख्या वैशिष्ट्यांसाठी स्क्रीनिंग ऑफर केली जात आहे. यामुळे डिझायनर बेबीजचे स्वप्न सत्य होताना दिसून येत आहे, यात आईवडिल स्वत:च्या मुलाला स्वत:च्या पसंतीनुसार डिझाइन करू शकतील.
अब्जाधीशांची महत्त्वाकांक्षा
टेक अब्जाधीश दीर्घ आयुर्मान आणि परिपूर्ण आरोग्याच्या ध्यासाने झपाटलेले आहेत. सॅम ऑल्टमॅन यासारखे लोक एआयसोबत जीन एडिटिंगला जोडून मानवतेला ‘अपग्रेड’ करू इच्छितात. परंतु अब्जाधीश मानवी जेनेटिक्सला किती बदलू इच्छितात? ते केवळ आजार संपवू पाहत आहेत का सुपरह्यूमन होणे इच्छित आहेत, असा प्रश्न उपस्थित होतोय. याचमुळे मोठ्या वैद्यकीय परीक्षणासाठी कठोर नियम आवश्यक आहेत. हा विकास विज्ञानाला नव्या उंचीवर नेऊ शकतो, परंतु चुकीच्या हातात हे जाण्याचा धोकाही असल्याचे वैज्ञानिक समुदायाचे सांगणे आहे.