For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

चांद्रयान-4 अन् चांद्रयान-5 मिशनचे डिझाईन तयार

06:11 AM Aug 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
चांद्रयान 4 अन् चांद्रयान 5 मिशनचे डिझाईन तयार
Advertisement

इस्रोप्रमुखांनी दिली माहिती : प्रस्तावाला सरकारच्या मंजुरीची प्रतीक्षा

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

इस्रो अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी चांद्रयान-4 मिशनवरून महत्त्वाची माहिती दिली आहे. चांद्रयान-5 चे डिझाईन तयार करण्यात आले आहे. चांद्रयान-3 मिशन पूर्ण झाले आहे. आता चांद्रयान-4 आणि चांद्रयान-5 वर नजर केंद्रीत झाली आहेत. या दोन्हींचे डिझाईन तयार असून आम्हाला आता सरकारकडून मंजुरी मिळण्याची प्रतीक्षा आहे. आम्ही आणखी एक स्टेशन निर्माण करू इच्छितो, जेथे 5 मॉड्यूल असतील, याचे पहिले मॉड्यूल 2028 मध्ये प्रक्षेपित होणार असून त्याचे डिझाईन तयार आहे. त्याबाबतचा प्रस्तावही मंजुरीसाठी सरकारकडे पाठविण्यात आल्याचे सोमनाथ यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.

Advertisement

पहिला भारतीय चंद्रावर पाऊल कधी ठेवणार असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. चंद्रावर मानवी पाऊल ठेवण्यावरून आमची मोहीम जारी आहे. याकरता वेळ लागणार असून आम्ही 2040 पर्यंतचे लक्ष्य ठेवले आहे. यासंबंधी हळूहळू पाऊल टाकले जात आहे. परंतु याची प्रक्रिया अजून काही वर्षांनी सुरू होणार आहे. याकरता ज्याप्रकारची गुंतवणूक आवश्यक आहे, त्याचा प्रस्ताव सरकारला सोपविण्यात आला आहे. सध्या सुमारे 50 उपग्रहांवरून नियोजन सुरू असून ते वेगवेगळ्या भूमिका बजावणार आहेत. त्यांचे डिझाईन तयार केले जात असल्याची माहिती सोमनाथ यांनी दिली.

इस्रोच्या चांद्रयान-3 मोहिमेने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरून इतिहास रचला होता. सोमनाथ यांना अलिकडेच आयआयटी खडगपूरच्या 74 व्या स्थापनादिनी संस्थेकडून स्पेशल लाईफ फेलो पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

Advertisement
Tags :

.