भव्य अंतराळयानाचे डिझाइन सादर
दिल्लीपेक्षा अधिक असणार लांबी
वैज्ञानिकांनी एक अनोखे अंतराळयान ‘क्रिसालिस’ डिझाइन केले असून जे लांबीत दिल्लीपेक्षाही अधिक मोठे आहे. याची लांबी 58 किलोमीटर आहे. तर दिल्लीची लांबी 51.9 किलोमीटर आहे. हे यान लोकांना पृथ्वीपासून सर्वात जवळची स्टार सिस्टीम अल्फा सेंच्युरीपर्यंत नेऊ शकते. ही यात्रा एकतर्फी असेल, म्हणजेच याला 400 वर्षे लागू शकतात.
अल्फा सेंच्युरी पृथपासून 25 ट्रिलियन मैल अंतरावर आहे, हे पृथ्वीपासून सर्वात जवळची स्टार सिस्टीम आहे. क्रिसालिस नावाचे हे यान 400 वर्षांमध्ये हा प्रवास पूर्ण करू शकते. याचा अर्थ अनेक पिढ्या या यानात जन्म घेतील आणि मृत्युमुखी पडतील, कारण त्यांचे पूर्वजच या यात्रेची सुरुवात करतील, म्हणजेच हे यान प्रॉक्सिमा सेंच्युरी बी नावाच्या एका ग्रहावर लोकांवर उतरवले, जो एक असा ग्रह आहे, ज्याला वास्तव्ययोग्य मानले जाते, हा पृथ्वीच्या आकाराचा आहे.
हा प्रकल्प ‘प्रोजेक्ट हायपरियन डिझाइन स्पर्धेत’ पहिले स्थान मिळविणारा ठरला आहे. यात टीम्सना अंतराळात अनेक पिढ्यांसाठी राहता येईल असे यान डिझाइन करण्याचे आव्हान देण्यात आले होते, विजेत्या टीमला 5 हजार डॉलर्सचे इनाम मिळाले आहे.
क्रिसालिसमध्ये जीवन कसे असणार
या यानात राहण्यासाठी प्रथम लोकांना तयार करावे लागेल, प्रारंभिक पिढ्यांना 70-80 वर्षांपर्यंत अंटार्क्टिकासारख्या वेगळ्या भागात राहून अनुकूलन करावे लागेल, जेणेकरून त्यांचे मानसिक आरोग्य चांगले राहिल, यानंतर यानाला 20-25 वर्षांमध्ये तयार केले जाऊ शकते, अशी वैज्ञानिकांची योजना आहे.
यानाचा आकार अन् गुरुत्वाकर्षण : क्रिसालिस 26 मैल (58 किलोमीटर) लांब असेल, यात कृत्रिम गुरुत्वाकर्षण तयार केले जाईल, जेणेकरून लोकांना पृथ्वीसारखे वातावरण मिळू शकेल.
रशियन बाहुलीसारखे डिझाइन : हे यान अनेक आच्छादनांमध्ये तयार होईल, रशियन बाहुलीप्रमाणे मध्ये एक कोर असेल, त्याच्या चहुबाजूला वेगवेगळी आवरणं असतील.
कोर : यात शटल असेल जे लोकांना प्रॉक्सिमा सेंच्युरी बीवर उतरवेल, तसेच संचार उपकरणेही असतील.
पहिले आवरण : अन्न तयार करण्यासाठी असेल, ज्यात रोप, मशरुम, कीट आणि पशूपक्षी असतील. उष्णकटिबंधीय आणि थंड जंगलासारखे वातावरण तयार केले जाईल, जेणेकरून जैवविविधता कायम राहू शकेल.
दुसरे आवरण : पार्क, शाळा, रुग्णालये आणि वाचनालयांसारख्या सुविधा असणार.
तिसरे आवरण : घरं असतील, ज्यात हवा आणि उष्णतेची व्यवस्था असेल.
चौथे आवरण : कामासाठी असेल ज्यात रिसायकलिंग, औषधे आणि निर्मितीच्या सुविधा.
पाचवे आवरण : गोदाम असेल, जेथ साधनसामग्री, यंत्रे ठेवली जातील. रोबोट या स्तराला चालवतील, जेणेकरून माणसांना कमी मेहनत करावी लागेल.
वीज : यानात न्युक्लियर फ्यूजन रिअॅक्टरने वीज तयार होईल, जे अद्याप व्यावसायिक स्तरावर उपलब्ध नाही.
लोकसंख्या नियंत्रण : जन्माला नियंत्रित केले जाईल, जेणेकरून लोकसंख्या 1500 च्या आसपास राहिल, जी यानाच्या क्षमतेपेक्षा (2400) कमी आहे.
शासन आणि तंत्रज्ञान
यानाचे शासन कृत्रिम बुद्धिमोसोबत मिळून चालविले जाईल, यात समाजाची स्थिरता कायम राहिल, पिढ्यांदरम्यान ज्ञानाची देवाणघेवाण होईल.
योजनेत कितपत सत्यता
ही सध्या केवळ एक काल्पनिक योजना आहे, न्युक्लियर फ्यूजन रिअॅक्टर सारखे तंत्रज्ञान सध्या उपलब्ध नाही, परंतु अशाप्रकारचे प्रकल्प आमचे ज्ञान वाढविणे आणि भविष्याच्या डिझाइन्समध्ये सुधारणा करण्यास मदत करतील. प्रोजेक्ट हायपरियनच्या ज्युरींनी क्रिसालिसचे डिझाइन आणि विस्तृत योजनेचे कौतुक केले आहे.