महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा यांची बदली

11:03 AM Aug 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

निरंजन राजे अरस नवे पोलीस उपायुक्त

Advertisement

बेळगाव : गुन्हे तपास व वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा यांची बदली झाली आहे. त्यामुळे रिक्त झालेल्या पदावर निरंजन राजे अरस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सरकारने गुरुवारी सायंकाळी राज्यातील आठ नॉन आयपीएस पोलीस अधीक्षकांच्या बदल्या केल्या आहेत. त्यामध्ये पी. व्ही. स्नेहा यांचा समावेश आहे. लोकायुक्त पोलीस अधीक्षकपदी त्यांची वर्णी लागली आहे. 30 जुलै 2021 पासून स्नेहा पोलीस उपायुक्त पदावर कार्यरत आहेत. तब्बल तीन वर्षांचा प्रदीर्घकाळ त्यांनी पोलीस उपायुक्त म्हणून बेळगावात सेवा बजावली आहे. या कार्यकाळात त्यांनी अनेक गुन्ह्यांचा छडा लावला आहे. एक जनस्नेही पोलीस अधिकारी म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली होती. त्यांची बदली झाली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article