उपमुख्यमंत्री पवार आणि आमदार शिंदेंची नागपुरात भेट
नागपूर
महाराष्ट्र राज्याचा मंत्रीमंडळ विस्तार नुकताच झाला आहे. यानंतर राज्याचा कारभार गतीशील झाल्याचे म्हणले जात आहे. राज्यातील मंत्रीमंडळाच्या विस्तारामध्ये ३९ मंत्र्यांनी शपथ घेतली. यामध्ये ३३ कॅबिनेट मंत्री तर ६ राज्य मंत्र्यांचा समावेश आहे. भाजपा आणि शिवसेनेचे ११ आमदार आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ९ मंत्री यांचा समावेश आहे. महायुतीच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोन दिवस नॉट रिचेबल झाले होते. अखेर आता अजित पवार दोन दिवस गायब का होते ? , हे सगळ्यांना कळाले. आज सकाळीच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार शिकांत शिंदे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली. यानंतर राजकिय वर्तुळात सर्वांच्या भुवया उंचवल्या.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज विधीमंडळ कामकाजात आजपासून सहभागी होणार आहेत. अजित पवार यांच्या घशाला इन्फेक्शन झाले असल्याने ते दोन दिवस आराम करत होते. तब्येतीच्या कारणामुळे ते दोन दिवस अधिवेशनात अनुपस्थित होते. त्यांच्या बंगल्यावर भेटण्यासाठी कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती.