Pandharpur Politics : उपमुख्यमंत्री शिंदेंची अनिल सावंतांच्या निवासस्थानी भेट!
पंढरपूरच्या राजकारणात ‘सावंत – शिंदे’ समीकरणावर सर्वांचे लक्ष केंद्रित
पंढरपूर : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भैरवनाथ शुगरचे चेअरमन अनिल सावंत यांच्या निवासस्थानी नुकतीच भेट दिली. पंढरपूरच्या राजकारणावर गेल्या गेल्या काही वर्षांपासून अनिल सावंत मोठी छाप टाकत आहेत. अशातच एकनाथ शिंदे यांच्यासोबत असणारे त्यांचे ऋणानुबंध या भेटीमुळे अधिक पुढे आले आहेत.
निमित्ताने कार्तिकी वारीच्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पंढरपूरला आले होते. मोठ्या धामधुमीच्या वेळेतही शिंदे यांनी वेळ काढून भैरवनाथ शुगरचे चेअरमन अनिल सावंत यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी राज्याचे माजी आरोग्य मंत्री तथा आमदार डॉ. तानाजीराव सावंत देखील उपस्थित होते. याप्रसंगी सावंत कुटुंबीयांच्या वतीने आणि भैरवनाथ परिवाराच्यावतीने एकनाथ शिंदे यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी रोजगार हमी योजनेचे मंत्री भरतशेठ गोगावले, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार अभिजित पाटील तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे व शिवसेनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. विशेष म्हणजे सावंत यांच्या निवासस्थानी शिंदे यांच्या स्वागतासाठी अनिल सावंत यांच्यासोबत विविध पश्नांचे पदाधिकारी उपस्थित होते.
सर्व पक्ष संबंध असणारे नेतृत्व म्हणून सध्या अनिल सावंत यांच्याकडे पाहिले जाते. चुलते माजी - मंत्री तानाजीराव सावंत आणि पुतणे - अनिल सावंत ही जोडी सध्या - एकनाथ शिंदे परिवाराशी ऋणानुबंध - अधिक घट्ट करताना दिसत आहे. पक्षीय सीमा तोडून वैयक्तिक पातळीवर सावंत आणि शिंदे परिवाराचे संबंध अधिक घट्ट असल्याचे या भेटीवरून सिद्ध होताला दिसते. पक्षीय राजकारण जरी वेगवेगळे असले तरी एकनाथ शिंदे यांनी अनिल सावंत यांच्या निवासस्थानी दिलेली भेट. अनिल सावंत यांची त्यांच्यासोबत असणारी जवळीकता, हे निश्चितच पंढरपूरच्या राजकारणाला नवी दिशा देणारी आणि अनिल सावंत यांची ताकद वाढवणारी असल्याचे बोलले जात आहे.