Eknath Shinde : पंढरपूर ते घुमाण संत नामदेव महाराज रथयात्रेचा उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते प्रारंभ
संत नामदेव महाराजांच्या रथयात्रा व सायकल वारीला सुरुवात
पंढरपूर : संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने श्री क्षेत्र पंढरपूर (महाराष्ट्र) ते श्री क्षेत्र घुमाण (पंजाब) या सुमारे पाच हजार किलोमीटर लांब पल्ल्याच्या व ३१ दिवस चालणाऱ्या देशातील पहिल्या अध्यात्मिक रथयात्रा व सायकल वारीचा प्रारंभ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते श्री क्षेत्र पंढरपूर येथे करण्यात आला.
भागवत धर्म प्रसारक मंडळ, पालखी सोहळा पत्रकार संघ, श्री नामदेव दरबार कमिटी व समस्त नामदेव शिंपी समाजाच्या वतीने संत नामदेव महाराज यांची ७५५ बी जयंती, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्री ज्ञानेश्वर महाराज यांचा ७२९ वा संजीवन समाधी सोहळा व शीख धर्माचे संस्थापक गुरुनानक देव यांच्या ५५६ व्या प्रकाश पर्वानिमित्त सालाबादप्रमाणे यंदा रविवार, २ नोव्हेंबर ते बुधवार, ३ डिसेंबर दरम्यान ३१ दिवसांची भव्य रथयात्रा व सायकल वारी आयोजित करण्यात आली आहे.
बारीचे हे चौथे वर्ष असून ही बारी महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, हरियाणा, पंजाब, दिल्ली, उत्तर प्रदेश व मध्यप्रदेश या आठ राज्यांतून प्रवास करणार आहे. या बारीत १५० सायकलस्वार व ५० भजनी मंडळी सहभागी झाली आहेत. ही पहिली अध्यात्मिक सायकल वारी आहे. रविवारीपहाटे पाच वाजता संत नामदेव महाराज यांच्या पादुकांची विधिवत पूजा करून रथयात्रा व सायकल वारीचा प्रारंभ करण्यात आला.