महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

डिप्रेशन भाग - 3

06:31 AM Nov 08, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

दि. 27.9.23 आणि दि. 11.10.23 च्या अंकात आपण ‘डिप्रेशन’ याविषयी दोन भागात जाणून घेतले. आपण माणसे आहोत म्हटल्यावर काळजी, ताण या गोष्टी असणारच आहेत परंतु त्याचे प्रमाण योग्य हवे. जर आपल्याला अजिबातच काळजी वाटली तर बेफिकिरीच्या दिशेने आपला प्रवास सुरू होईल त्यामुळे गतीसाठी योग्य प्रमाणात ताण आवश्यक आहे. परंतु त्याचे प्रमाण वाढत नाही ना याकडे या भावनिक मोजपट्टीद्वारे आपण लक्ष ठेवू शकतो.

Advertisement

? आपले मानसिक आरोग्य तपासण्यासाठी स्वत:ला काही प्रश्न  विचारणे आवश्यक आहे.

Advertisement

  1. आपण स्वत:शी स्वस्थ आहोत का?
  2. इतरांना आपल्या सहवासात स्वस्थ वाटते का?
  3. आपल्यातल्या उणिवांचा शोध घेऊन त्या दूर करण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्नशील आहोत का?

याची उत्तरे नकारार्थी आल्यास मानसिक आरोग्यात काहीतरी बिघाड झाला आहे हे लक्षात घ्यायला हवे.

? तसेच आपले ध्येय वास्तववादी ठेवण्यासाठी प्रयत्नशील असायला हवे.

? एखादा छंद वा आवड जोपासणे.

? हलका व्यायाम, प्राणायाम, आपल्या मनात येणाऱ्या विचार भावना उत्सुकतेने न्याहाळणे, श्वासावर लक्ष केंद्रीत करत हालचाल, नैसर्गिक श्वसनासोबत होणारी छाती पोटाची हालचाल जाणणे हे दररोज न चुकता करायला हवे.

? आपण व्यक्त होऊ शकतो असे मित्र-मैत्रिणी जोडायला हवेत.

? होणारे बदल लक्षात घेऊन टाळाटाळ न करता योग्य व्यक्तीचा सल्ला घेणे आवश्यक आहे

? शरीरासारखे मनही आजारी पडू शकते याचा स्वीकार करायला हवा.

? नकारात्मक भावनांची तीव्रता, वारंवारता, कालावधी कमी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न आवश्यक आहेत.

प्रथमोपचार-

‘मानसिक प्रथमोपचार’ ही संकल्पना ऊजविताना, आधार देताना भावनांची सजगता, हाताळणी ही कौशल्ये आपण स्वत: शिकणे आणि त्या व्यक्तीला ती आत्मसात करायला मदत करणे आवश्यक आहे. अशी मदत करायची असेल तर ‘न बोलता ऐकू येणारे कान’ तयार करणे आवश्यक आहे. म्हणजेच एखाद्या व्यक्तीमध्ये वरील पैकी काही लक्षणे दिसत आहेत, बदल जाणवत आहेत तर तिच्याशी, त्या व्यक्तीच्या नातेवाईकांसोबत चर्चा करून या भावनांची वारंवारता, तीव्रता, कालावधी जाणून घेणे गरजेचे आहे. वरीलपैकी अशी लक्षणे एखाद्या व्यक्तीमधे दिसली तर जागऊकतेने आपण त्याच्याशी संपर्क साधायला हवा. हे करत असताना कदाचित तुमचे मित्र मैत्रिणी, कुटुंबीय यांच्याकडून ‘लष्कराच्या भाकऱ्या भाजतो’ असे सूर कानावर पडण्याची शक्मयता नाकारता येत नाही. परंतु आपण आपल्या ध्येयावर ठाम रहात त्या व्यक्तीसाठी काय करता येईल याचा विचार करणे गरजेचे आहे.

  1. डिप्रेशनच्या ऊग्णाला भावनिक आधाराची गरज असते.
  2. उपदेश न करता ती व्यक्ती काय म्हणते आहे ते ऐकून घेणे.
  3. त्या व्यक्तीच्या मनात ‘मी आहे’ हा आश्वासक भाव निर्माण करणे आवश्यक आहे.
  4. त्या व्यक्तीला होणारा त्रास लक्षात आल्यावर कुटुंबीयांना विश्वासात घेऊन त्यांच्यासोबत संवाद साधत त्या व्यक्तीला गरजेनुसार समुपदेशक वा मानसोपचार तज्ञाकडे जाण्यास राजी करणे.
  5. फोनच्या माध्यमातून त्या व्यक्तीच्या संपर्कात राहणे गरजेचे आहे.

समजा एखादी व्यक्ती डिप्रेशनच्या उंबरठ्यावर असेल. उदा. हल्ली जरा अस्वस्थ वाटतंय, मन लागत नाही, मन विचारात भरकटते, उदासी जाणवते असे जर कुणी आपल्याला सांगत असेल तर या भावनिक पट्टीनुसार ती व्यक्ती नेमकी कुठे आहे हे पाहण्यासाठी आपण तिला मदत करू शकतो.

भावनिक मोजपट्टी

---।---।---।---।---।-----।-----।--,!0

-5 -4 -3 -2 -1 0 1 2 3      4                         5

? त्या व्यक्तीच्या नातेवाईंकांपर्यंत पोहचून ती व्यक्ती नेमकी कशी वागते आहे. तिच्या नजीकच्या संपर्कातील कुणाला काय बदल जाणवतात हेही जाणून घेऊ शकतो.

? जसं की अलीकडेच ती/तो थोडा अलिप्त राहते/राहतोय.. काहीतरी बदलतंय हे लक्षात येत आहे. ‘थोडं उदास वाटतं’ अशी सौम्य पद्धतीची लक्षणे असतील तर मन दुसरीकडे वळवणारे छंद जोपासणे, मनातील भावना विचार याकडे लक्ष देत त्याच्यातून वेगळे करण्याचे कौशल्य शिकवणे या मधूनही ती व्यक्ती बाहेर येऊ शकते.

? समजा त्या व्यक्तीची चिडचिड होते आहे, झोप लागत नाही, निराशा वाटते आहे तर अशावेळी वरील गोष्टींसोबतच त्या व्यक्तीला समुपदेशनासाठी तयार करणे, समुपदेशकांकडे जाण्यासाठी प्रेरीत करणे गरजेचे आहे.

? डिप्रेशनची बऱ्यापैकी लक्षणे आहेत तर समुपदेशन आणि मानसोपचार याची सांगड घालणे आवश्यक ठरते. मानसोपचार तज्ञांच्या मदतीने डिप्रेशनवरील उपचार आणि समुपदेशन यामुळे ती व्यक्ती योग्य ट्रॅकवरती येऊ शकते.

? डिप्रेशन तीव्र स्वऊपातील असेल तर नातेवाईकांना सोबत घेत, समजावत तात्काळ मानसोपचार तज्ञांची मदत, व्यवस्थित उपचार घेणे, त्या उपचारांमध्ये मानसोपचार तज्ञांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार सातत्य ठेवणे, खंड न पडू देणे या गोष्टीही आवश्यक आहेत. त्यासाठी आपण त्या व्यक्तीच्या कुटुंबीयांच्या संपर्कात राहू शकतो.

आपण काय कऊ शकतो..

? कनेक्ट- अशा व्यक्तीला मी सोबत आहे या भावनेने आश्वस्त करणे.

? काउन्ट-तू माझ्यासाठी महत्त्वाचा आहेस ही भावना आपल्याला शक्मय असेल तर आपण नाहीतर त्याच्या नातेवाईकांच्या माध्यमातून त्या व्यक्तीपर्यंत पोहचविणे गरजेचे आहे.

? पॅपॅबिलिटी-तू सक्षम आहेस, हे तू नक्कीच करू शकशील ही भावना त्या व्यक्तीच्या मनात निर्माण करणे.

? करेज-म्हणजेच ‘आताचे दिवसही निघून जातील’ तू नक्कीच या परिस्थितीतून पुढे प्रगतीच्या दिशेने जाशील हा उद्याचा आशेचा किरण निर्माण करणे.

अशा पद्धतीने सजग भावनांची सजगता वाढविण्याच्या दृष्टीने आपण सजगतेने समाजासाठी काम केले तर निश्चितच मनोविकारांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्यास मदत होईलच आणि गरज असलेल्या व्यक्तीला योग्यवेळी योग्य मार्गदर्शन मिळून सामाजिक आरोग्यही निकोप राहण्यास मदत होईल.

-अॅड.सुमेधा संजीव देसाई

Advertisement
Tags :
##tarunbharatnews#social media
Next Article