महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

डेपो टायगर्स, ड्रॉपिन वॉरियर्स संघ विजयी

10:15 AM May 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

हुबळी प्रीमियर लीग 16 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धा

Advertisement

बेळगाव : हुबळी येथे बी.डी.के. स्पोर्ट्स फाउंडेशन आयोजित 16 वर्षाखालील हुबळी प्रीमियर ज्यूनियर लीग क्रिकेट स्पर्धेत बुधवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यातून डेपो टायगर्सने आनंद क्रिकेट अकॅडमीचा तर ड्रॉपिन वॉरिअर्सने नम्म गदगचा पराभव करून प्रत्येकी 4 गुण मिळवले. सुरेंद्र पाटील (डेपो टायगर्स) आरव जास्तवाल (ड्रॉपिन) यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला. हुबळी येथे सुरू असलेल्या हुबळी प्रीमियर लीग 16 वर्षाखालील आंतर क्लब क्रिकेट स्पर्धेत पहिल्या सामन्यात आनंद क्रिकेट अकादमी बेळगाव संघाने प्रथम फलंदाजी करताना 30 षटकात 8गडी बाद 109 धावा केल्या. त्यात हैदरअली सय्यदने 2 षटकार 2 चौकारांसह 46 धावा, आतिफ 14, साईराज साळुंखेने 12, तर आर्यन एस. एम.ने 10 धावा केला. डेपो टायगर्सर्फे सुरेंद्र पाटीलने 18 धावात 4 गडी, तर विश्वास, अर्णव यांनी प्रत्येकी एक गडी बाद केले.

Advertisement

प्रत्युत्तरादाखल खेळताना डेपो टायगर्सने 25.1 षटकात 5 पाच गडी बाद 110 धावा करून सामना 5 गड्यांनी जिंकला. त्यात अर्णव कुंदपने 9 चौकारासह 55, साई पवारने 21 तर सुरेंद्र पाटील व शुभम खोत यांनी प्रत्येकी 10 धावा केल्या. आनंद तर्फे विहान भूषद, आकाश, साईरत, नितीन यांनी प्रत्येकी एक गडी बात केले. दुपारी खेळविण्यात आलेल्या दुसऱ्या सामन्यात नम्म गदगने प्रथम फलंदाजी करताना 25 षटकात सर्व गडी बात 111 धावा केल्या. त्यात स्वरूप एस.ने 5 चौकारांसह 36 , मनखा एसने 20, तर प्रीतमने 19 धावा केल्या. ड्रॉपिंग वॉरियर्स तर्फे सागर के ने 26 धावात 3, सुमुख व सोहम पाटील यांनी प्रत्येकी 22 धावात 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना ड्रॉपिन वॉरीअर्सने 20 षटकात 2 गडी बाद 112 करून सामना 8 गाड्यांनी जिंकला. त्यात आरवने 7 चौकारांशस 42, रोनकने 4 चौकारांसह 31 धावा केल्या. नम्म गदग तर्फे हरीश व नितीन त्यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article