महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मजगाव परिसरात डेंग्यूचा पुन्हा शिरकाव

10:22 AM Jun 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

गजानननगर परिसरात 25 हून अधिक रुग्ण: डास प्रतिबंधक औषधाची फवारणी

Advertisement

वार्ताहर/मजगाव 

Advertisement

गजानननगर वॉर्ड नं. 58 मजगाव येथील वसाहतमधील 25 हून अधिक नागरिक डेंग्यू आजाराने बाधीत आहेत.अनेकांना खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. तर काहीजण घरीच उपचार घेत आहेत. सदर आजारामुळे मजगाव परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. गेल्या चार वर्षापूर्वी डेंग्यूमुळे दोन महिलांनी प्राण गमावल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. गुरूवारी सकाळी गजानननगर परिसरात महानगर पालिकेतर्फे डास प्रतिबंधक औषधाची फवारणी करण्यात आली. सदर परिसरामध्ये दूषित पाण्याचा निचरा होत नसल्याचे समजते. येथील रहिवासी दिपक हट्टीहोळी यांनी नगरसेविका प्रिया सातगौडा व दिपक सातगौडा यांना सदर घटना निदर्शनास आणून दिल्यानंतर महानगरपालिकेतर्फे स्वच्छता मोहीम राबविण्याचे आश्वासन दिले.संबंधित अधिकाऱ्यांनी पाहणी करून मजगाव परिसर स्वच्छ करावा व भुयारी गटारीची सोय करावी अशी ग्रामस्थांनी मागणी केली आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article