For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बिबट्याच्या बंदोबस्तासाठी वन विभागाने विशेष मोहीम राबवावी या मागणीसाठी रासपाच्या वतीने मलकापुरात निदर्शने

03:05 PM Nov 24, 2023 IST | Kalyani Amanagi
बिबट्याच्या बंदोबस्तासाठी वन विभागाने विशेष मोहीम राबवावी या मागणीसाठी रासपाच्या वतीने मलकापुरात निदर्शने
Advertisement

शाहुवाडी प्रतिनिधी

Advertisement

शित्तुर पैकी तळीचा धनगर वाडा येथील आठ वर्षीय सारिका बबन गावडे या शालेय विद्यार्थिनीचा बिबट्याचा हल्ल्यात मृत्यू झाला आहे . यापुढे अशा घटना घडू नयेत व जीवित हानी होऊ नये यासाठी वन विभागाने विशेष मोहीम राबवून तात्काळ कारवाई करावी या मागणीसाठी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने मलकापूर येथे विठ्ठल मंदिर नजीक निदर्शने करून आपल्या मागणीचे  निवेदन वन विभागाला दिले .

राष्ट्रीय समाज पक्षाचे तालुका अध्यक्ष अभिषेक पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही निदर्शने करण्यात आली . यावेळी बिबट्याने केलेल्या हल्ल्याच्या घटनेबाबत तीव्र भावना व्यक्त करण्यात आल्या . वन विभागाने अशा परीसरात विशेष खबरदारी घ्यावी .यापुढे अशा घटना घडू नयेत यासाठी उपया योजना राबवावी संबंधित बिबट्याचा शोध तात्काळ घ्यावा .अशा परिसरात तेथील नागरिकांना भयमुक्त जगता यावे यासाठी उपाययोजना कराव्या अशा विविध मागण्यांचे निवेदन परिक्षेत्र वन अधिकारी मलकापूर यांना दिले .सदर निवेदन वन विभागाचे आर ए गार्दी डी जाधव एम एन नायकवडे यांनी स्वीकारले.   रासपचे अभिषेक पाटील, पांडुरंग पांढरे ,महेश सावंत ,रघुनाथ कांबळे, विकी गोसावी, महेश मोरे ,हरिश्चंद्र मोरे ,विशाल गोसावी , अविनाश गोसावी आदींनी हे निवेदन दिले .निदर्शन स्थळी पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील व पोलीस कर्मचारी यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता .

Advertisement

दरम्यान वन विभागाच्या वतीने या ठिकाणी राबवलेल्या उपाययोजना कोणत्या आहेत याविषयीचे लेखी पत्र कार्यकर्त्यांना दिले .वनविभागाच्या वतीने या ठिकाणी ग्रस्त सुरू आहे ,कॅमेरे लावले आहेत, ड्रोन चा वापर सुरू आहे त्याचबरोबर जनजागृती सूरू  असून सापळा देखील लावण्यात आला आहे अशा माहितीचे लेखी पत्र दिले .

Advertisement
Tags :

.