For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

महाद्वार रोड येथील ड्रेनेजची समस्या सोडविण्याची मागणी

11:01 AM Jul 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
महाद्वार रोड येथील ड्रेनेजची समस्या सोडविण्याची मागणी
Advertisement

बेळगाव : गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. यातच महाद्वार रोड, सहावा क्रॉस येथे ड्रेनेजचे पाणी तुंबून सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. याबाबत महानगरपालिकेला कळवूनही त्याला कोणताच प्रतिसाद दिला नाही. परिणामी या परिसरात आरोग्याची गंभीर समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. तेव्हा तातडीने अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे. सध्या शहरात साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया यासारख्या आजारांनी अनेक जण त्रस्त झाले आहेत. यातच जोरदार पाऊस व ड्रेनेजचे पाणी साचल्यामुळे महाद्वार रोड परिसरात समस्या निर्माण झाली आहे. तेव्हा तातडीने मनपाने ही समस्या सोडवावी, अशी मागणी होत आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.