महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

समर्थनगरमध्ये पायाभूत सुविधा पुरविण्याची आमदारांकडे मागणी

10:38 AM Feb 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : समर्थनगर येथे रस्ता, गटारी, पिण्याचे पाणी यासह इतर समस्या मोठ्या प्रमाणात आहेत. परंतु, या समस्यांकडे अद्याप कोणी लक्ष दिलेले नाही. त्यामुळे किमान आमदारांनी तरी लक्ष घालून या समस्या सोडवाव्यात, अशी मागणी समर्थ युवक मंडळाच्यावतीने बेळगाव उत्तरचे आमदार राजू सेठ यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. समर्थनगर येथे लोकवस्ती वाढली असून पायाभूत सेवासुविधांची कमतरता पडत आहे. त्यामुळे आमदारांनी या परिसराची पाहणी करून माहिती घेण्याची मागणी युवक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केली. आपण आठ दिवसात समर्थनगर येथे भेट देऊन मागण्यांची पूर्तता करू, असे आश्वासन दिले. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख बंडू केरवाडकर, प्रकाश राऊत, दीपक नगरकर, मनोज तानवडे, राम कटारे, सिद्धार्थ कम्मार, विनायक शिंदेसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article