For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सीपीएड ग्राऊंडजवळील खड्डा बुजवण्याची मागणी

12:05 PM Nov 24, 2025 IST | Tarun Bharat Portal
सीपीएड ग्राऊंडजवळील खड्डा बुजवण्याची मागणी
Advertisement

बेळगाव : क्लब रोड हा रहदारीसाठी असलेल्या मार्गांपैकी एक आहे. यामुळे या मार्गावरून दररोज शेकडो वाहनांची ये-जा होत असते. दरम्यान या मार्गावरील सीपीएड ग्राऊंडजवळ मोठा खड्डा पडला असून, वाहनधारकांना वाहतुकीदरम्यान धोका निर्माण होत आहे. जरी हा खड्डा रस्त्याशेजारी असला तरी धोकादायक ठरू शकतो. अपघात टाळण्यासाठी संबंधित विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन खड्डा बुजवण्याची मागणी होत आहे.

Advertisement

क्लब रोड हा प्रमुख मार्गांपैकी एक आहे. राणी चन्नम्मा सर्कलला जाण्यासाठी, हिंडलगा, सीमाभागात, महाराष्ट्रात जाण्यासाठी या मार्गाचा अवलंब केला जातो. या मार्गावरून शेकडो वाहनांची ये-जा होत असते. दररोज स्थानिकासह परराज्यात जाणारे प्रवासी या मार्गाचा अवलंब करतात. तसेच येथे सैन्य भरती प्रक्रियाही पार पडते. यामुळे विविध भागातील मुले भरतीसाठी या मार्गावर येत असतात. एकंदरीत हा मार्ग सर्वांसाठी महत्त्वाचा आहे.

खड्ड्याचा रहदारीस अडथळा

Advertisement

मोठ्या संख्येने या मार्गावर वर्दळ असते. मात्र सीपीएड ग्राऊंडजवळ खड्डा पडल्याने रहदारीस अडचण निर्माण होत आहे. परिणामी अपघाताची शक्यताही नाकारता येत नाही. यामुळे याकडे संबंधित विभागाने लक्ष देण्याची गरज आहे. तसेच लवकरात लवकर खड्डा बुजवून प्रवाशांना सुरक्षित प्रवास करण्यास  सहकार्य करावे. एखादी मोठी घटना घडण्याअगोदर खड्डा बुजवण्याची मागणी जोर धरत आहे.

Advertisement
Tags :

.