For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

जिल्हा मध्यवर्ती बँकेस अर्थसहाय्य करण्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेकडे मागणी

02:19 PM Dec 30, 2023 IST | Abhijeet Khandekar
जिल्हा मध्यवर्ती बँकेस अर्थसहाय्य करण्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेकडे मागणी
DCM Ajit Pawar

उमरगा प्रतिनिधी
आर्थिक अडचणीत असलेल्या उस्मानाबाद धाराशिव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस अर्थसहाय्य करण्यासाठी चेअरमन बापुराव पाटील व माजी चेअरमन सुरेश बिराजदार यांनी उपमुख्यमंत्री, तथा वित्तमंत्री अजितदादा पवार यांची, मुंबई येथे भेट घेऊन निवेदन दिले.
अजित पवार यांनी बँकेची सद्य आर्थिक स्थिती, बँकेसमोरील अडीअडचणी तसेच त्यावर मात करणेसाठी या बँकेमार्फत सुरू असलेल्या प्रयत्नांचा सहानुभूतीपुर्वक विचार करून या बँकेने मागणी केलेला आवश्यक निधी या बँकेस मिळवून देणे बाबत आश्वस्थ केले. यावेळी,व्हाईस चेअरमन मधुकर मोटे, प्रकाश आष्टे,कार्यकारी संचालक व्ही.एल. घोगरे आदि उपस्थित होते

Advertisement

Advertisement
Tags :
×

.