कणेरी मठाधीशांवर बेळगाव जिल्हा प्रवेशबंदीची मागणी
बेळगाव : महात्मा बसवेश्वर महाराजांना राज्य सरकारने सांस्कृतिक नेते म्हणून घोषित केले आहे. याची घोषणा करून वर्षपूर्ती झाल्यानिमित्त राज्यभरात बसव संस्कृती अभियान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये विविध मठाधीश, महास्वामीजी सहभागी होत आहे. मात्र कणेरी मठाच्या मठाधीशांनी कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या सर्वांबद्दल वादग्रस्त विधान करून मठाधीशांचा अपमान केला आहे.. त्यांचे कृत्य निषेधार्थ असून कणेरी मठाधीशांना बेळगाव जिल्ह्यात प्रवेशावर बंदी घालण्याची मागणी बसव तत्त्वांच्या पुरस्कार करणाऱ्या संघटनांच्यावतीने करण्यात आली. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
कणेरी मठाधीशांनी केलेले विधानाने धार्मिक असहिष्णूता भडकली असून जनतेमध्ये गेंधळ निर्माण झाला आहे. यामुळे सामाजिक शांतता भंग पावली आहे. त्यांच्या विधानाने बसव भक्त संतप्त झाले असून राज्यभरात कणेरी मठाधीशांचा निषेध करून निदर्शने करण्यात येत आहेत. बसव संस्कृती मोहिमेबाबत उदासिनता दाखवून सार्वजनिकांमध्ये गोंधळ माजवणाऱ्या कणेरी मठाधीशांवर कारवाई करून बेळगाव जिल्हा प्रवेशावर बंदी घालावी. यावेळी शिवलिंगाप्पा तोरणगट्टी, बाबू शिवणकर, मल्लिकार्जुन सुळकर, बसवराज माळगी, आनंद शिवणकर यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.