आमदार बसनगौडा पाटील-यत्नाळ यांना अटक करण्याची मागणी
12:00 PM Sep 26, 2025 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
बेळगाव : विजापूरचे आमदार बसनगौडा पाटील-यत्नाळ दलित, मुस्लीम आणि लिंगायत समुदायांविऊद्ध सतत अपमानजनक विधाने करत आहेत. यामुळे समाजात अशांतता पसरत आहे. वेळीच त्यांच्यावर आळा घालून त्यांना त्वरित अटक करून त्यांच्याविरोधत अॅट्रोसिटी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी भीम आर्मीच्यावतीने करण्यात आली. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. बसनगौडा पाटील-यत्नाळ हे आपल्या वादग्रस्त विधानाने वारंवार तेढ निर्माण करत आहेत. यामुळे समाजातील शांतता, सौहार्द व संवैधानिक मूल्यांचा अपमान होत आहे. यासाठी त्यांना अटक करण्याबाबत त्वरित कायदेशीर कारवाई करणे अत्यावश्यक आहे. जर कारवाई झाली नाही तर भीम आर्मीच्यावतीने बेंगळूरमध्ये तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.
Advertisement
Advertisement
Advertisement
Next Article