महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

बिहारला विशेष दर्जा देण्याची मागणी

06:52 AM Jun 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

संयुक्त जनता दलाच्या बैठकीत प्रस्ताव संमत, पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडीसमवेत राहणार

Advertisement

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

Advertisement

बिहार राज्याला विशेष दर्जा देण्यात यावा, अशी मागणी संयुक्त जनता दलाने केली आहे. येथे शनिवारी झालेल्या या पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत या मागणीचा प्रस्ताव संमत करण्यात आला. तसेच पक्षाचे राज्यसभा सदस्य संजय कुमार झा यांची पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. नितीश कुमार हेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून राहतील, अशीही घोषणा करण्यात आली.

बिहारमध्ये 2025 च्या नोव्हेंबर महिन्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. या निवडणुकीवर विचार या बैठकीत करण्यात आला. विधानसभा निवडणुकीसंदर्भात पक्षाच्या धोरणाविषयीही चर्चा करण्यात आली. घटनेच्या 9 व्या परिशिष्टात अन्य मागावर्गिय, अतिमागासवर्गिय, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांच्यासाठी वाढीव आरक्षणाची तरतूद समाविष्ट करण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीची तयारी आणि ही निवडणूक कोणत्या मुद्द्यांवर लढावायची, यावर विचार करणे हा कार्यकारिणी बैठकीचा मुख्य हेतू होता, अशी माहिती नंतर पक्षाच्या सूत्रांनी पत्रकारांनी दिली आहे. बिहारला विशेष दर्जा किंवा विशेष पॅकेज देण्याचा प्रस्ताव बिहार विधानसभेतही नुकताच संमत करण्यात आला आहे. यावर केंद्राशी चर्चा करण्यात येणार आहे.

सर्व निवडणुका लढविणार

2025 मध्ये भारतात जेथे निवडणुका असतील त्या सर्व लढविण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच या निवडणुकांमधील प्रत्येक मतदान केंद्रावर पक्षाचे पाच ते दहा कार्यकर्ते असतील अशी व्यवस्था करण्याचा निर्णयही घेण्यात आला. बिहारबाहेर पक्षाची संघटना बळकट करण्यासाठी गांभीर्याने प्रयत्न केला जाणार आहे. त्यासाठी लवकरच योजना आखली जाणार असे स्पष्ट करण्यात आले. मात्र, बिहारची विधानसभा निवडणूक हे पक्षाचे प्रथम लक्ष्य असेल असे स्पष्ट केले गेले.

सर्व नेते उपस्थित

संयुक्त जनता दलाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला पक्षाचे सर्व प्रमुख नेते उपस्थित होते. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या अध्यक्षतेत ही बैठक झाली. पक्षाचे लोकसभा आणि राज्यसभेचे खासदार, बिहार विधानसभेतील पक्षाचे बहुसंख्य आमदार, राष्ट्रीय नेते आणि इतर नेते बैठकीला उपस्थित राहिले. नितीश कुमार यांनी उपस्थितांना अनेक सूचना केल्या. पक्षविस्तारासाठी झटण्याचे आवाहन केले.

विशेष दर्जा की विशेष पॅकेज

बिहारला विशेष दर्जा देण्यात यावा, ही संयुक्त जनता दलाची मागणी प्रदीर्घकाळापासूनची आहे. विशेष दर्जा मिळाल्यास या राज्यातील केंद्रीय विकास प्रकल्पांमधील मोठा आर्थिक वाटा केंद्राला उचलावा लागतो. आतापर्यंत विविध केंद्र सरकारांनी ही मागणी मान्य केलेली नाही. कारण ती मान्य केल्यास इतर राज्यांकडूनही ती केली जाऊ शकते. काही कारणांसाठी विशेष दर्जा देता येत नसल्यास बिहारला विशेष आर्थिक पॅकेज देण्यात यावे, असा पर्याय पक्षाने सुचविला आहे. ही मागणी मान्य होईल अशी पक्षाची अपेक्षा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार बहुमतासाठी संयुक्त जनता दलावर अवलंबून आहे. त्यामुळे बिहारचे प्रश्न मार्गी लागतील, अशी शक्यता संजदला वाटत आहे. या प्रश्नांसंबंधी केंद्र सरकारशी लवकरच चर्चा केली जाईल, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली.

रालोआतच राहणार

केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार भक्कम असून संयुक्त जनता दल राष्ट्रीय लोकशाही आघाडीतच राहणार असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीत या आघाडीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. त्यामुळे सरकार चालविण्याचा जनादेश आघाडीकडे आहे. संयुक्त जनता दल आघाडीला भक्कम करण्याचे काम करणार आहे, असे प्रतिपादन करण्यात आले. आगामी विधानसभा निवडणूकही भारतीय जनता पक्षाशी युती करुनच लढविली जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. सध्या हीच युती राज्यात सत्तेवर आहे.

ड संजद राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत महत्वाचे प्रस्ताव झाले संमत

ड बिहारला प्रगतीसाठी विशेष दर्जा किंवा विशेष पॅकेजची आवश्यकता

ड केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार भक्कम केले जाणार

ड बिहारच्या प्रश्नांवर केंद्र सरकारशी लवकरच चर्चा केली जाणे शक्य

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article