For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कल्लेहोळ कलमेश्वरनगर येथील रस्ता डांबरीकरणाची मागणी

10:21 AM Mar 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
कल्लेहोळ कलमेश्वरनगर येथील रस्ता डांबरीकरणाची मागणी
Advertisement

उचगाव : कल्लेहोळ कलमेश्वरनगर, नवीन वसाहत भागातील सरकारी मराठी माध्यमिक विद्यालय तसेच स्मशानभूमी आणि या भागातील रहिवाशांकरिता ये-जा करण्यात येणाऱ्या रस्त्याची अक्षरश: दुर्दशा झाली असून रस्त्याची सुविधा उपलब्ध नसल्याने येथील नागरिकांची कुचंबणा होत आहे. तरी संबंधित खात्याने तातडीने या रस्त्याचे डांबरीकरण अथवा काँक्रीटीकरण करण्यात यावे, अशी मागणी रहिवाशांतून करण्यात येत आहे. कल्लेहोळ गावाच्या दक्षिण भागात कलमेश्वरनगर तसेच नवीन वसाहत भागात मोठ्या संख्येने नागरिकांची वसाहत निर्माण झालेली आहे. मात्र याच भागात असलेल्या सरकारी मराठी माध्यमिक शाळेकडे ये-जा करण्यासाठी तसेच अनेक नागरिकांनी घरे बांधलेली आहेत. या घरांकडे ये-जा करण्यासाठी तसेच स्मशानभूमीकडेही ये-जा करण्यासाठी असलेल्या रस्त्याची अक्षरश: दुर्दशा झाली आहे. सदर रस्ता उन्हाळ्यात धुळीने माखलेला असून या रस्त्यावरील दगड-धोंडे उखडून गेलेले असतात, तर पावसाळ्यामध्ये सदर रस्ता चिखलमय झालेला असतो. याच खराब रस्त्यावरून विद्यार्थ्यांना, शिक्षकांना ये-जा करावी लागते. पावसाळ्यात तर या चिखलाशी सामना आणि कसरत करत या रस्त्यावरून शाळेत वाहनावरून कसे पोहोचावे, हा मोठा प्रश्न असतो. मयतावर अंत्यसंस्कार करण्यासाठी रात्रीच्या वेळी स्मशानभूमीकडे जाण्यासाठी अंधारातून चाचपडत स्मशानभूमी गाठावी लागते. अशावेळी नागरिकांची फार मोठी फजिती होते. यासाठी तातडीने या रस्त्याची दुऊस्ती करण्यात यावी आणि येथील नागरिकांचे होत असलेले हाल थांबवावेत, अशी मागणी या भागातील नागरिकांतून करण्यात येत आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.