For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बसवण कुडची येथील ‘त्या’ रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी

10:27 AM Jun 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
बसवण कुडची येथील ‘त्या’ रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी
Advertisement

बेळगाव : बसवण कुडची येथील विठ्ठल-रखुमाई मंदिरासमोरून तळ्याकडे जाणाऱ्या रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. या रस्त्यावरूनच जैन स्मशानभूमीकडे ये-जा करावी लागते. मात्र, गेल्या 25 वर्षांपासून या रस्त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. तातडीने या रस्त्याचे डांबरीकरण करावे, अशी मागणी या परिसरातील नागरिकांतून होत आहे. या रस्त्यावर पावसाळ्यामध्ये चिखल होतो. त्या चिखलामधून ये-जा करणे अवघड होते. शेताकडे जाण्यासाठीही हा महत्त्वाचा रस्ता आहे. तसेच या रस्त्याच्या परिसरात नागरी वसाहतही आहे. त्यामुळे त्या नागरिकांना या रस्त्यावरूनच ये-जा करावी लागते. विद्यमान नगरसेवक बसवराज मोदगेकर यांनी पावसाळ्यापूर्वी या रस्त्याचे डांबरीकरण करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी येथील रहिवाशांतून होत आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.