For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

खादरवाडी क्रॉस रस्त्यावरील खड्ड्यांच्या दुरुस्तीची मागणी

10:11 AM Jul 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
खादरवाडी क्रॉस रस्त्यावरील खड्ड्यांच्या दुरुस्तीची मागणी
Advertisement

किणये : खादरवाडी क्रॉसवरील रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडलेले आहेत. या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचले आहे. या खड्ड्यांमुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. रात्रीच्या वेळी खड्ड्यांचा अंदाज येत नसल्यामुळे काही दुचाकीस्वार पडून जखमी झाल्याचे प्रकारही घडलेले आहेत, अशी माहिती स्थानिकांनी दिली आहे. गेल्या काही महिन्यापासून या ठिकाणी खड्डे पडलेले आहेत. सदर खड्डे बुजवण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. या खड्ड्यांची त्वरित दुऊस्ती करण्यात यावी, अशी मागणी वाहनधारक व नागरिकांतून होत आहे. बेळगाव-पणजी महामार्गावरील खादरवाडी क्रॉस येथे सदर खड्डे दिसून येतात. खादरवाडी गावाकडे जाणाऱ्या प्रवेशद्वारावरच मोठे खड्डे असल्यामुळे बऱ्याच वेळेला वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ लागला आहे. या रस्त्यावरून खादरवाडी गावातील वाहनधारक तसेच उद्यमबाग औद्योगिक वसाहतीमधील वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी आधुनिक क्रॉसवरील रस्त्याची पाहणी करून मोठा अनर्थ होण्याआधीच या रस्त्यावरील खड्ड्यांची दुऊस्ती करण्यात यावी, अशी नागरिक मागणी करीत आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :

.