कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सौंदत्ती डोंगरावर यात्राकाळात मूलभूत सुविधा पुरविण्याची मागणी

11:04 AM Nov 14, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : सौंदत्ती यल्लम्मा देवी हे लाखो भाविकांचे आराध्य दैवत आहे. दरवर्षी लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी येत असतात. सोमवार दि. 1 डिसेंबर ते गुरुवार दि. 4 डिसेंबरअखेर यल्लम्मा देवीची यात्रा होणार आहे. बुधवार दि. 3 रोजी सौंदत्ती यल्लम्मा देवीच्या यात्रेचा मुख्य दिवस आहे. यात्राकाळात जिल्हा प्रशासनाकडून मूलभूत सुविधा पुरविण्याची मागणी कोल्हापूर जिल्हा रेणुका भक्त संघटनेच्यावतीने करण्यात आली. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. निवेदनात, यात्राकाळात मंदिरातील सर्व दरवाजे खुले करण्यात यावेत.

Advertisement

शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात यावा. उघड्यावरील शौचावर बंदी आणून टॉयलेटची सोय करावी. जोगनभावी कुंडावरील शॉवरना व टायलेटमध्ये मुबलक पाण्याचा पुरवठा करावा. कोल्हापुरातून येणाऱ्या भाविकांच्या बसेसना डोंगरावर पार्किंगसाठी परवानगी द्यावी. पोलीस प्रशासनाकडून नाहक त्रास देण्यात येऊ नये. मंदिर परिसरातील येनी कुंडातील पाण्याचा भाविकांवर सतत शिडकाव करावा. चोऱ्या व अन्य गैरप्रकारांवर आळा घालण्यासाठी चोख बंदोबस्त ठेवावा, असे नमूद करण्यात आले आहे.यावेळी अच्युत साळोखे, सरदार जाधव, सुभाष जाधव, तानाजी चव्हाण, सुशांत पाटील, दयानंद घबाडे व पदाधिकारी उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article