महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

महाराष्ट्र संस्कृतीला छेद देणाऱ्या गौतमी पाटीलच्या कार्यक्रमावर बंदी घाला

03:36 PM Dec 22, 2022 IST | Abhijeet Khandekar
Advertisement

gautamipatil- लावणी क्वीन व रिल्स क्वीन म्हणून प्रसिद्ध असणारी गौतमी पाटील रोज वेगवेगळ्या कारणांसाठी गाजते आहे. Gautami Patil आता पुन्हा अडचणीत येण्याची शक्यता आहे. गौतमी पाटील हीच्या लावणीवर महाराष्ट्रामध्ये बंदी आणावी. त्याचबरोबर मिरजेच्या बेडग या ठिकाणी गौतमी पाटीलच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या मृत्यू प्रकरणी गौतमी पाटील हिच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी राष्ट्र विकास सेनेच्या वतीने करण्यात आलेली आहे. युवक प्रदेशाध्यक्ष प्रशांत सदामते यांनी सांगली पोलिसांकडे निवेदनाद्वारे ही मागणी केली आहे.

Advertisement

गौतमीच्या नृत्याचे जितके चाहते आहेत, तितकेच तिच्या सौंदर्यावर आणि फॅशनवर देखील फिदा आहेत. मात्र, आपल्या नृत्यामुळे सर्वांना भुरळ घालणारी प्रसिद्ध लावणीकार गौतमी पाटील अडचणीत येण्याची शक्यता आहे.

Advertisement

महाराष्ट्राच्या संस्कृतीला आणि लावणी संस्कृतीला गौतमी ही छेद देण्याचे काम करत आहे. तिच्या लावणी कार्यक्रमात तिच्याकडून होणारे अश्लील हावभाव, हातवारे, इशारे यामुळे प्रचंड प्रमाणात त्या लावणी कार्यक्रमाला गर्दी होत आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होत आहे. काही दिवसांपूर्वी बीड या ठिकाणी गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमामध्ये असा प्रकार घडला होता.
.

Advertisement
Tags :
gautamipatilinstaqweenlavanilavanigautamipatil
Next Article