For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हलशी प्राथमिक आरोग्य केंद्रात कायमस्वरुपी डॉक्टर नेमण्याची मागणी

10:47 AM Sep 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
हलशी प्राथमिक आरोग्य केंद्रात कायमस्वरुपी डॉक्टर नेमण्याची मागणी
Advertisement

हलशी : खानापूर तालुक्यातील हलशी प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टरांसह इतर आवश्यक कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. त्यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत. तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांचा दर्जा सुधारणे तसेच आवश्यक उपचार वेळेत मिळावेत, यासाठी प्राथमिक केंद्रात डॉक्टरांची नेमणूक करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. खानापूर तालुक्यातील अनेक गावे दुर्गम भागात आहेत. तसेच तालुक्याच्या अनेक भागात सरकारी आणि खासगी रुग्णालयांची संख्या अतिशय कमी प्रमाणात आहे. त्यामुळे नागरिकांना उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा खानापूर, नंदगड, बिडी या भागातील रुग्णालयांवर अवलंबून राहावे लागते.

Advertisement

ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय सेवा व्यवस्थित उपलब्ध नसल्याने तसेच त्या ठिकाणी डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफ उपलब्ध नसल्याने तसेच काही प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या डॉक्टरांवर दोन-दोन आरोग्य केंद्रांचा पदभार सांभाळावा लागत असल्याने दोन्ही ठिकाणी आरोग्य सेवा कोलमडली आहे. या आरोग्य केंद्रातून परिचारिका आणि इतर कर्मचाऱ्यांवर प्राथमिक आरोग्य केंद्रांचा भार असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून हलशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतील डॉक्टरांवर गणेबैल येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा अतिरिक्त भार सोपविण्यात आला आहे. त्यामुळे दोन्ही ठिकाणी योग्यप्रकारे उपचार मिळत नसल्याने अनेक तक्रारी वाढत आहे. याची दखल घेऊन तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्रांची संख्या वाढवावी. तसेच आरोग्य केंद्रांना आवश्यक सुविधा देण्यात याव्यात, अशी मागणी जनतेतून होत आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.