महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

गणेशोत्सवातील निर्माल्याचा प्रश्न ऐरणीवर

11:36 AM Sep 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

नदी, तलावांच्या काठांवर निर्माल्य : जल प्रदूषणाचा धोका गंभीर : ग्रामपंचायतींनी निर्माल्यकुंड ठेवण्याची गरज 

Advertisement

बेळगाव : गणेशोत्सवाला उत्साहात प्रारंभ झाला आहे. मात्र, पूजेसाठी वापरलेल्या निर्माल्याचा प्रश्न ऐरणीवर येऊ लागला आहे. रविवारी दीड दिवसांच्या गणरायाला निरोप देण्यात आला. दरम्यान, गणेशमूर्तींबरोबर तलाव, नदी आणि विहिरीत निर्माल्य विसर्जित करण्यात आले आहे. त्यामुळे पाणी प्रदूषणाचा मोठा धोका निर्माण झाला आहे. नदी आणि तलावांच्या काठावर निर्माल्य कुंड ठेवण्याची मागणी नागरिकांतून होत आहे. आंबेवाडी येथील मार्कंडेय नदीकाठावर रविवारी मोठ्या प्रमाणात निर्माल्य विसर्जित केल्याचे दिसून आले. त्यामुळे नदीकाठाच्या सौंदर्यालाही बाधा येत आहे. गणेशोत्सव काळात दीड दिवस, पाच दिवस, सात दिवस आणि अकराव्या दिवशी घरगुती आणि सार्वजनिक गणेशमूर्तींचे मोठ्या प्रमाणात विसर्जन केले जाते. त्याबरोबरच गणेशोत्सव काळात विविध धार्मिक कार्यक्रम आणि पूजा-अर्चाही आयोजित केल्या जातात. मात्र, कार्यक्रमानंतर निर्माल्य नदी, तलावांच्या काठावरच टाकले जाते. त्यामुळे गणेशोत्सव काळात निर्माल्याचा प्रश्न गंभीर बनू लागला आहे. संबंधित ग्राम पंचायतींनी तलाव आणि नदीकाठावर निर्माल्यकुंड उभे करून व्यवस्था करावी, अशी मागणी होऊ लागली आहे.

Advertisement

निर्माल्याचा प्रश्न चिंतेचा विषय

शहर आणि ग्रामीण भागातील सार्वजनिक गणेशमूर्ती आणि घरगुती गणेशमूर्ती सर्रास मार्कंडेय नदीत विसर्जित केल्या जातात. दरम्यान, निर्माल्य नदीकाठावरच ठेवले जाते. त्यामुळे परिसरात अस्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनू लागला आहे. शिवाय काही दिवसांनंतर दुर्गंधीही पसरू लागली आहे. नदी परिसरातील उचगाव, सुळगा, बाची, तुरमुरी, मण्णूर, आंबेवाडी, अलतगा, कंग्राळी खुर्द, कडोली, होनगा, काकती, जाफरवाडी आदी गावांतील गणेशमूर्ती  नदीपात्रात विसर्जित केल्या जातात. त्यामुळे नदीकाठावर निर्माल्याचा ढीग जमू लागला आहे. त्यामुळे गणेशोत्सव काळात निर्माल्याचा प्रश्न चिंतेचा विषय बनू लागला आहे.

संबंधितांनी गांभीर्याने घेणे गरजेचे

रोजगार हमी योजनेतून नदीची स्वच्छता करून गाळ काढण्यात आला आहे. मात्र, आता निर्माल्य नदीपात्रातच सोडले जात असल्याने प्रदूषणाचा प्रश्नही निर्माण होऊ लागला आहे. यंदा समाधानकारक पावसामुळे नदीपात्रात मुबलक पाणी आहे. मात्र, या पाण्यातच निर्माल्य सोडले जात असल्याने पाणी प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनू लागला आहे. याबाबत संबंधित ग्राम पंचायत, पीडीओ आणि ग्रा. पं. सदस्यही गांभीर्याने घेणार का? हे पाहावे लागणार आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article