डॉ.बाबासाहेब आंबेडकर दिव्यांग संघाला जमीन देण्याची मागणी
बेळगाव : डॉ. बाबासाहेब आंबेडकर दिव्यांग कल्याण संघाची शैक्षणिक संस्था 2023 पासून खानापूर तालुक्यातील विद्यानगर येथे भाड्याच्या इमारतीत सुरू आहे. या संस्थेत मतिमंद, मूकबधिर व अपंग मुले शिक्षण घेत आहेत. यामुळे खानापूर तालुक्यातील नागुर्डा ग्राम पंचायत व्याप्तीतील काटगाळी येथील 5 एकर 25 गुंठे सरकारी जमीन डॉ. बाबासाहेब आंबेडकर दिव्यांग संघाला द्यावी, अशी मागणी संघातर्फे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. सरकारी जमीन संघाला दिल्यास हक्काच्या जागेत संस्था इमारतीच्या माध्यमातून दिव्यांगांना शिक्षण देणे सोयीस्कर होणार आहे. त्याचबरोबर दिव्यांगांना निवारा मिळून त्यांचे उज्ज्वल भविष्य घडविण्यास मदत होणार आहे. तालुक्यातील 4 हजार दिव्यांगाना त्याचा लाभ होणार आहे. या जमिनीत निवासी शाळा, फिजिओथेरपी, क्रीडा संकुल आदी योजना राबविणेही सोपी होणार आहे. सध्या संस्थेत शिकत असलेल्या 300 मुला-मुलींचा विचार करून सदर जमीन संघाला देण्याची मागणी करण्यात आली.