बेळगाव-सांबरा मार्गावरील बाजूपट्ट्यांची त्वरित दुरुस्त करण्याची मागणी
10:19 AM Aug 02, 2024 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
सांबरा : बेळगाव-सांबरा मार्गावरील बाजूपट्ट्या ठिकठिकाणी खचल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. तरी संबंधित खात्याने तातडीने बाजूपट्ट्यावर भराव टाकावा अशी मागणी जोर धरू लागली आहे . बेळगाव-सांबरा रस्त्यावर दररोज वाहनांची जास्त वर्दळ असते. त्यामुळे या रस्त्याची देखभाल करणे गरजेचे आहे. सध्या मुतगे येथे या रस्त्याची दुर्दशा झाली आहे. मुख्य रस्त्यावर लहान-मोठे खड्डे पडले आहेत. गावच्या बसथांब्यानजीकच्या रस्त्याच्या बाजूपट्ट्या मोठ्या प्रमाणावर खचल्या आहेत. नजीकच शाळा असल्याने येथून विद्यार्थ्यांचे येणे-जाणे असते. या रस्त्यावरून जाणाऱ्या नवीन वाहनचालकांना खचलेल्या बाजूपट्ट्यांचा अंदाज येत नसल्याने अपघात होण्याचा जास्त संभव आहे. यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने बाजूपट्ट्यांची दुऊस्ती करावी अशी मागणी वाहनचालकांतून होत आहे.
Advertisement
Advertisement
Advertisement
Next Article