For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नेपाळमध्ये पुन्हा हिंदू राष्ट्राची मागणी

06:47 AM Apr 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
नेपाळमध्ये पुन्हा हिंदू राष्ट्राची मागणी
Advertisement

शेकडो लोक रस्त्यावर : आंदोलन चिघळण्याची चिन्हे

Advertisement

वृत्तसंस्था/ काठमांडू

नेपाळमध्ये हिंदू राष्ट्राची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. राजधानी काठमांडूच्या रस्त्यावर शेकडो लोक आंदोलन करत आहेत. ते देशात पुन्हा राजेशाही लागू करण्याची मागणी करत आहेत. रस्त्यावर उतरलेले आंदोलक पंतप्रधान कार्यालय आणि इतर सरकारी कार्यालयांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी त्यांची पोलिसांशी झटापटही झाली. आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज, अश्रुधूर आणि पाण्याच्या फवाऱ्यांचा वापर केल्याने आंदोलन चिघळले आहे. नेपाळच्या राष्ट्रीय प्रजातंत्र पक्षाच्या नेतृत्वाखाली राजधानीमध्ये निदर्शने सुरू आहेत. प्रजातंत्र पक्षाने फेब्रुवारीमध्ये पंतप्रधान कार्यालयाला 40 कलमी निवेदनही पाठवले होते. यामध्ये भ्रष्टाचाराला आळा घालण्याची मागणी करण्यात आली होती.

Advertisement

नेपाळचे पंतप्रधान पुष्पकमल दहल प्रचंड यांनी अलीकडेच नेपाळी काँग्रेस पक्षासोबतची युती तोडत केपी शर्मा ओली यांच्या नेतृत्वाखालील कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ (यूएमएल) सोबत नवीन सरकार स्थापन केले. त्यांची भूमिका चीन समर्थक असल्याचे म्हटले जाते. या सगळ्यात राजेशाहीशी संबंधित अनेक गट देशातील प्रमुख पक्षांवर भ्रष्टाचार आणि गैरकारभाराचे आरोप करत आहेत. देशातील जनता विद्यमान राजकारण्यांना कंटाळल्याचा त्यांचा दावा आहे.

Advertisement
Tags :

.