For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

निवडणूक कामातून मुक्त करण्याची मागणी

11:02 AM Apr 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
निवडणूक कामातून मुक्त करण्याची मागणी
Advertisement

150 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांचे नोडल अधिकाऱ्यांकडे अर्ज

Advertisement

बेळगाव : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारी अधिकाऱ्यांना विविध कामांसाठी नेमणूक करण्यात आले आहे. मात्र यामधील अनेक अधिकाऱ्यांकडून वैद्यकीय कारण पुढे करून निवडणुकीच्या कामांतून मुक्त करण्याची मागणी केली आहे. शनिवारी दिवसभरात 150 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांनी यासाठी अर्ज केला आहे. लोकसभा निवडणुकीसाठी निवडणुकीच्या कामाकरिता सरकारच्या विविध खात्यातील अधिकाऱ्यांवर विविध कामांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडावी, यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये महसूल, शिक्षण, बागायत, सहकार, उपनोंदणी, तालुका पंचायत, जिल्हा पंचायत, सार्वजनिक बांधकाम खाते, महिला आणि बाल कल्याण, मागासवर्गीय कल्याण खाते, समाज कल्याण खाते, महानगरपालिका आदी विविध खात्यातील कर्मचाऱ्यांची निवडणुकीच्या कामासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र यामधील अनेक कर्मचाऱ्यांना वैद्यकीय कारणामुळे निवडणुकीच्या कामाला हजर होता येणार नाही. या कारणावरुन जिल्हाधिकाऱ्यांकडे अनेक कर्मचाऱ्यांनी वैद्यकीय कारणास्तव निवडणुकीच्या कामातून सूट देण्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये दोन पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या माध्यमातून निवडणुकीच्या कामातून सूट मागू इच्छिणाऱ्यांकडून अर्ज स्वीकारण्यात आले आहेत. बहुतांश कर्मचाऱ्यांनी वैद्यकीय कारण सांगून सूट मागितली आहे.

अर्जांची छाननी करून सूट देण्याबाबत निर्णय

Advertisement

दरम्यान अर्ज स्वीकारताना उपस्थित असणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणी करून तसेच वैद्यकीय प्रमाणपत्रांची छाननी करून अर्ज स्वीकारले आहेत. 150 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांनी निवडणुकीच्या कामातून मुक्त करण्यासाठी अर्ज केला आहे. यावर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शेरा मारला असून अर्जांची छाननी करून सूट देण्याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे अर्ज स्वीकारलेल्या नोडल अधिकाऱ्यांनी सांगितले.

Advertisement
Tags :

.