महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

क. नंदगड येथील बस शेडची स्वच्छता करण्याची मागणी

10:52 AM Jul 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मद्यपींनी टाकलेल्या कचऱ्याकडे दुर्लक्ष

Advertisement

नंदगड : खानापूर-यल्लापूर राज्य मार्गावरील कसबा नंदगड क्रॉसवर जनतेच्या सेवेसाठी बस शेड बांधण्यात आले आहे. परंतु या बस शेडचा उपयोग सायंकाळी व रात्रीच्या वेळी मद्यपी करताना दिसत आहेत. एवढेच नव्हेतर बस स्टॅण्डमध्येच दारू पिऊन टाकण्यात आलेले प्लास्टिकचे ग्लास, सोबत स्नॅक्ससाठी नेण्यात आलेली प्लास्टिक पाकिटे तसेच कागद व कचरा टाकण्यात आला आहे. सध्या पाऊस पडत असल्यामुळे हा कचरा काहीअंशी ओला झाला आहे. त्यामुळे सदरच्या जागेत डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. बस शेडमधील स्वच्छता कोणीच करत नसल्याने दुर्गंधी पसरली आहे. या बस शेडपासून अर्धा किलोमीटरच्या अंतरावर नंदगड पोलीस स्टेशन आहे. सायंकाळी साडेसहा वाजल्यानंतर अंधारात मद्यपी दारू पिण्यासाठी या बस स्टॅण्डमध्ये येऊन बसतात. ही नित्याचीच गोष्ट आहे. असे असताना मात्र नंदगड पोलिसांचे या घटनेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष झाले आहे. तर कसबा नंदगड ग्रामपंचायतीनेही याकडे कानाडोळा केला आहे. त्यामुळे या बस स्टॅण्डमध्ये बसणाऱ्या मद्यपिंची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article