चापगाव येथील ग्रंथपालावर कारवाईची मागणी
तालुका पंचायत अधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव : तालुक्यातील चापगाव येथील ग्रा.पं. च्यावतीने चालवण्यात येणाऱ्या सार्वजनिक ग्रंथालयातील ग्रंथपाल पिराजी कुऱ्हाडे हे वेळेवर ग्रंथालयात उपस्थित रहात नाहीत. आपल्या युट्युब चॅनलसाठी बातम्या संकलन करत फिरत असतात. त्यामुळे वाचनालय बंद असते. यासाठी त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन तालुका पंचायत व्यवस्थापक सपटला यांना नुकतेच देण्यात आले. यावेळी अभिजीत पाटील, जयदेव अंबाजी, पुंडलिक धबाले, म्हात्रू जीवाई, कृष्णा जीवाई यासह इतर नागरिक उपस्थित होते. निवेदनावर ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
चापगाव येथील ग्रा.पं.तर्फे चालवण्यात येणाऱ्या सार्वजनिक वाचनालयात ग्रंथपाल म्हणून कुऱ्हाडे हे गेली अनेक वर्षे काम पहात आहेत. मात्र अलीकडे त्यांनी कन्नड वर्तमान पत्रात तसेच स्वत:चे युट्युब चॅनेल सुरू केले आहे. त्यामुळे ते पत्रकारिता करत सातत्याने बाहेर असतात. त्यामुळे ग्रंथालय कायम बंद असते. मात्र ग्रंथपाल म्हणून सेवा बजावत आहेत. त्यामुळे शासनाचे नुकसान होत आहे. आणि सामान्य नागरिकांना ग्रंथालय बंद असल्यामुळे मोठी गैरसोय होत आहे. यापूर्वी 4-4-2024 रोजी नोटीस देवूनसुद्धा कुऱ्हाडे यांचे वर्तन सुधारलेले नाही. त्यामुळे त्यांच्यावर तातडीने कारवाई करावी, अशी मागणीचे निवेदन ता.पं.व्यवस्थापक सपटला यांना देण्यात आले आहे.