For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दिल्लीचा गुजरातवर 25 धावांनी विजय

06:44 AM Mar 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
दिल्लीचा गुजरातवर 25 धावांनी विजय
Advertisement

वृत्तसंस्था/ बेंगळूर

Advertisement

कर्णधार मेग लेनिंगचे अर्धशतक तसेच राधा यादवच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर रविवारी येथे खेळविण्यात आलेल्या महिलांच्या दुसऱ्या प्रिमियर लीग टी-20 स्पर्धेतील सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने गुजरात जायंट्सचा 25 धावांनी पराभव केला. या विजयामुळे आता दिल्ली कॅपिटल्सने स्पर्धेच्या गुणतक्त्यात 4 सामन्यातून 6 गुणांसह आघाडीचे स्थान मिळविले आहे. सरस धाव सरासरीच्या जोरावर दिल्लीने मुंबईला मागे टाकले आहे. मुंबई इंडियन्सने 6 गुण घेतले आहेत. अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या जोनासेनला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.

Advertisement

रविवारच्या सामन्यात गुजरात जायंट्सने नाणेफेक जिंकून दिल्ली कॅपिटल्सला प्रथम फलंदाजी दिली. दिल्लीने 20 षटकात 8 बाद 163 धावा जमवित गुजरातला विजयासाठी 164 धावांचे आव्हान दिले. दिल्लीच्या डावात सलामीच्या कर्णधार लेनिंगने 41 चेंडूत 1 षटकार आणि 6 चौकारांसह 55, शेफाली वर्माने 9 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह 13, अॅलिसी कॅप्सेने 17 चेंडूत 5 चौकारांसह 27, रॉड्रीग्जने 7, सदरलँडने 12 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह 20, जोनासेनने 7 चेंडूत 1 षटकारासह 11 तसेच शिखा पांडेने 8 चेंडूत 2 चौकारांसह नाबाद 14 धावा केल्या. दिल्लीच्या डावामध्ये 4 षटकार आणि 16 चौकार नोंदविले गेले. लेनिंग आणि कॅप्से यांनी तिसऱ्या गड्यासाठी 47 धावांची भर घातली. गुजराततर्फे मेघना सिंगने 37 धावात 4, गार्डनरने 37 धावात 2 तर कंवर आणि काश्यप यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

प्रत्युत्तरादाखल खेळताना दिल्लीच्या शिस्तबद्ध आणि भेदक गोलंदाजीसमोर गुजरात जायंट्सने 20 षटकात 8 बाद 138 धावांपर्यंत मजल मारल्याने त्यांना हा सामना 25 धावांनी गमवावा लागला. गुजरात संघाच्या डावामध्ये अनुभवी गार्डनरने 31 चेंडूत 1 षटकार आणि 5 चौकारांसह 40, लिचफिल्डने 10 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह 15, कर्णधार मुनीने 2 चौकारांसह 12, कृष्णमूर्तीने 2 चौकारांसह 12, कंवरने 1 चौकारासह 13, पठाणने 1 चौकारासह 9, मेघना सिंगने नाबाद 10 धावा केल्या. गुजरातच्या डावामध्ये अवांतर 17 धावा मिळाल्या. पहिल्या पॉवरप्ले दरम्यानच्या 6 षटकात गुजरातने 41 धावा जमविताना 3 गडी गमाविले. गुजरातचे अर्धशतक 44 चेंडूत, शतक 82 चेंडूत नोंदविले गेले. दिल्लीतर्फे राधा यादव आणि जोनासेन यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले. शिखा पांडे व रे•ाr यांनी प्रत्येकी 1 बळी मिळविला. गुजरातच्या डावामध्ये 2 षटकार आणि 13 चौकार नोंदविले गेले.

संक्षिप्त धावफलक - दिल्ली कॅपिटल्स 20 षटकात 8 बाद 163 (लेनिंग 55, कॅप्से 27, शेफाली वर्मा 13, सदरलँड 20, जोनासेन 11, शिखा पांडे नाबाद 14, अवांतर 6, मेघना सिंग 4-37, गार्डनर 2-37, काश्यप 1-16, कंवर 1-31), गुजरात जायंट्स 20 षटकात 8 बाद 138 (गार्डनर 40, मुनी 12, लिचफिल्ड 15, कृष्णमूर्ती 12, कंवर 13, मेघना सिंग नाबाद 10, अवांतर 17, राधा यादव 3-20, जोनासेन 3-22, शिखा पांडे 1-28, रे•ाr 1-27).

Advertisement
Tags :

.