दिल्लीचा आज राजस्थानशी मुकाबला
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
हंगामाची स्वप्नवत सुऊवात केल्यानंतर घरच्या मैदानावर नाट्यामय पराभवामुळे हैराण झालेला दिल्ली कॅपिटल्स संघ आज बुधवारी आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सचा सामना करताना त्यातून सावरण्याचा प्रयत्न करेल. चार सामन्यांच्या विजयी मालिकेवर स्वार झालेल्या अक्षर पटेल याच्या नेतृत्वाखालील कॅपिटल्सची गती रविवारी मुंबई इंडियन्सविऊद्धच्या पराभवाने थांबली. या पराभवामुळे ते गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर घसरले आहे.
याउलट राजस्थान रॉयल्स सहा सामन्यांतून फक्त दोन विजयांसह अनिश्चित स्थितीत आहेत आणि आठव्या क्रमांकावर आहेत. त्यांना हंगामात सातत्य दाखविता आलेले नाही. स्थानिक हंगामात चांगली कामगिरी केलेला आणि इम्पॅक्ट प्लेयर म्हणून खेळणारा खेळाडू कऊण नायरने फिरोजशाह कोटलावरील दिल्लीच्या पहिल्या सामन्यात 206 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना 89 धावांची शानदार खेळी केली. 10 षटकांत 1 बाद 119 अशी अवस्था असताना सामना जवळजवळ त्याच्ंया खात्यात जमा होणे निश्चित होते. पण त्यानंतर जे घडले ते धक्कादायक होत. 19 व्या षटकांत तीन खेळाडू धावबाद झाले आणि दिल्लीचा संघ अखेर 193 धावांवर गारद झाला.
कॅपिटल्सना सदर सामन्यातून दोन गुण मिळवण्याची संधी गमावल्याबद्दल नि:संशयपणे दु:ख होईल. परंतु लगेच आणखी एक महत्त्वाचा सामना खेळावा लागणार असल्याने त्या पराभवावर जास्त विचार करण्याइतका त्यांच्यापाशी वेळ नाही. आज सामन्यात पुन्हा एकदा फिरकीपटू दिल्लीसाठी महत्त्वाची भूमिका बजावतील. संध्याकाळी दवाचे आव्हान राहणार असूनही मनगटी फिरकीपटू कुलदीप यादव आणि 20 वर्षीय विप्रज निगम आपली जादू दाखविण्याचा प्रयत्न करतील. हे दोन्ही गोलंदाज या हंगामात दिल्लीसाठी उत्कृष्ट कामगिरी करणारे ठरले आहेत आणि त्यांच्या फिरकीने विरोधी फलंदाजांना अडचणीत आणले आहे.
तथापि, कर्णधार अक्षर पटेलला अद्याप आपली छाप टाकता आलेली नाही. कर्णधार म्हणून त्याने संघाचे नेतृत्व उत्तम प्रकारे केले आहे, परंतु हा डावखुरा फिरकी गोलंदाज सहा सामन्यांमध्ये 14 षटकांत एकही बळी घेऊ शकलेला नाही, त्याने 10 पेक्षा कमी धावा दिल्या आहेत. चांगल्या फलंदाजीसाठीही ओळखला जाणारा हा अष्टपैलू खेळाडू अद्याप स्पर्धेत आपली चमक दाखवू शकलेला नाही. गेल्या हंगामात आपल्या पॉवर-हिटिंगने रंगत आणणारा तऊण खेळाडू जेक फ्रेझर-मॅकगर्कही निष्प्रभ ठरला असून त्याने केवळ 46 धावा काढलेल्या आहेत. दुखापतीमुळे फाफ डु प्लेसिस अजूनही बाजूला असल्याने नायरने संघातील आपले स्थान पक्के केले आहे असे दिसते. के. एल. राहुलचा अनुभव, ट्रिस्टन स्टब्स, आशुतोष शर्मा आणि आशादायक निगम यांच्यामुळे या हंगामात दिल्लीची मधली फळी मजबूत दिसत आहे.
दुसरीकडे, भारतीय स्टार खेळाडूंवर अवलंबून असलेल्या राजस्थानच्या फलंदाजी विभागाने वारंवार खराब कामगिरी केली आहे. आरसीबीविऊद्धच्या पराभवात यशस्वी जैस्वालने शानदार अर्धशतक झळकावलेले असले, तरी त्याचा एकंदरित फॉर्म खराबच राहिलेला आहे. कर्णधार संजू सॅमसनने अद्याप मोठी खेळी केलेली नाही तसेच रियान पराग आणि ध्रुव जुरेल यांना मोठा प्रभाव पाडता आलेला नाही. गोलंदाजीच्या आघाडीवर जोफ्रा आर्चर आयपीएलच्या इतिहासातील सर्वांत महागड्या स्पेलमधून बाहेर सरलेला असला, तरी रॉयल्सचा एकूण मारा निस्तेज वाटतो. संदीप शर्मा वगळता त्यांच्या गोलंदाजांना धावांचा ओघ नियंत्रित करण्याच्या बाबतीत संघर्ष करावा लागला आहे.
संघ-दिल्ली कॅपिटल्स : अक्षर पटेल (कर्णधार), फाफ डु प्लेसिस, कऊण नायर, समीर रिझवी, जेक फ्रेझर-मॅकगर्क, आशुतोष शर्मा, के. एल. राहुल, अभिषेक पोरेल, डोनोवन फेरेरा, ट्रिस्टन स्टब्स, माधव तिवारी, त्रिपुराना विजय, मानवंथ सुतार, विप्रज निगम, अजय मंडल, दर्शन नळकांडे, मुकेश कुमार, मोहित शर्मा, टी. नटराजन, मिचेल स्टार्क, दुष्मंथा चमीरा, कुलदीप यादव.
राजस्थान रॉयल्स : संजू सॅमसन (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभम दुबे, नितीश राणा, रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरोन हेटमायर, जोफ्रा आर्चर, महेश थीक्षाना, तुषार देशपांडे, संदीप शर्मा, फजलहक फाऊकी, कुणाल सिंह राठोड, आकाश मधवाल, कुमार कार्तिकेय, क्वेना मफाका, वानिंदू हसरंगा, युधवीर सिंह चरक, अशोक शर्मा, वैभव सूर्यवंशी.
सामन्याची वेळ : संध्याकाळी 7.30 वा.