For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दिल्लीचा आज हैदराबादशी मुकाबला

06:41 AM Mar 30, 2025 IST | Tarun Bharat Portal
दिल्लीचा आज हैदराबादशी मुकाबला
Advertisement

वृत्तसंस्था/ विशाखपट्टणम

Advertisement

एलएसजीविऊद्धच्या विजयानंतर मनोबल वाढलेला आणि भारताचा यष्टीरक्षक-फलंदाज के. एल. राहुलच्या पुनरागमनामुळे बळकटी मिळालेला दिल्ली कॅपिटल्स आज रविवारी विशाखापट्टणम येथे होणाऱ्या सनरायझर्स हैदराबादविऊद्धच्या लढतीत वेगवान कामगिरी करण्याचा प्रयत्न करेल. मोहिमेच्या जोरदार सुऊवातीनंतर हैदराबाद गुऊवारी लखनौ सुपर जायंट्सकडून पाच गड्यांनी पराभूत झाले. या पराभवामुळे त्यांच्या स्फोटक फलंदाजीला लगाम घालता येतो हे दिसून आले आहे.

कर्णधार पॅट कमिन्सवर त्यामुळे पुनरागमनासाठी दबाव राहील. दुसरीकडे, राहुल एका नवीन संघासमवेत सुऊवात करताना छाप पाडण्यास उत्सुक असेल. राहुलच्या पुनरागमनामुळे मागील सामन्यात संघर्ष केलेल्या दिल्लीच्या वरच्या फळीला आवश्यक स्थिरता मिळेल. फलंदाजीव्यतिरिक्त राहुल पहिल्यांदाच संघाचे नेतृत्व करत असलेल्या अक्षर पटेलला महत्त्वपूर्ण आधार देऊ शकतो.

Advertisement

दिल्लीकडे मिचेल स्टार्कच्या नेतृत्वाखाली एक जबरदस्त गोलंदाजी विभाग असून त्याचा सामना स्टार्कचा ऑस्ट्रेलियन सहकारी ट्रॅव्हिस हेडशी होईल. स्टार्क, अक्षर आणि कुलदीप यादव हे हैदराबादच्या अभिषेक शर्मा आणि हेड या स्फोटक सलामी जोडीला आळा घालण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरतील. शेवटच्या टप्प्यात स्टब्स आणि मोहित शर्मा देखील महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतात. मागील सामन्यात हैदराबादच्या कमिन्सने प्रति षटक सरासरी 15 धावा दिल्या होत्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियन कर्णधार स्वत:ची कामगिरी सुधारण्यासही उत्सुक असेल.

संघ-सनरायझर्स हैदराबाद : पॅट कमिन्स (कर्णधार), इशान किशन, अथर्व तायडे, अभिनव मनोहर, अनिकेत वर्मा, सचिन बेबी, हेनरिक क्लासेन, ट्रॅव्हिस हेड, हर्षल पटेल, कामिंदू मेंडिस, वायन मुल्डर, अभिषेक शर्मा, नितीश कुमार रे•ाr, मोहम्मद शमी, राहुल चाहर, अॅडम झॅम्पा, सिमरजित सिंग, झीशान अन्सारी,  जयदेव उनाडकट, इशान मलिंगा.

दिल्ली कॅपिटल्स : अक्षर पटेल (कर्णधार), के. एल. राहुल, जॅक फ्रेझर-मॅकगर्क, कऊण नायर, फाफ डू प्लेसिस, डोनोव्हन फेरेरा, अभिषेक पोरेल, ट्रिस्टन स्टब्स, समीर रिझवी, आशुतोष शर्मा, दर्शन नळकांडे, विपराज निगम, अजय मंडळ, मानवंथ कुमार, त्रिपुराना विजय, माधव तिवारी, मिचेल स्टार्क, टी. नटराजन, मोहित शर्मा, मुकेश कुमार, दुष्मंथा चमीरा, कुलदीप यादव.

सामन्याची वेळ : दुपारी 3.30 वा.

Advertisement
Tags :

.