For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

चंदगड समस्यामुक्त करण्यसाठी हक्काचा माणूस दिल्लीत पाठवा : संयोगिताराजे छत्रपती

03:47 PM Apr 24, 2024 IST | Abhijeet Khandekar
चंदगड समस्यामुक्त करण्यसाठी हक्काचा माणूस दिल्लीत पाठवा   संयोगिताराजे छत्रपती
Sanyogitaraje Chhatrapati
Advertisement

आमरोळीत प्रचारसभा; काँग्रेसचा जाहीरनामा सर्वसमावेशक, आश्वासनांची पूर्तता होणारच : संभाजीराव देसाई

चंदगड : प्रतिनिधी

निसर्गाचे वरदान लाभल्याने चंदगड तालुक्याच्या पर्यटनवाढीस भरपूर वाव आहे. येथील चवदार काजूला चांगली बाजारपेठ मिळवून देण्याची तसेच केंद्र स्तरावर पाठपुरावा करून काजूला हमीभाव मिळवून देण्याची गरज आहे. ग्रामीण भागात अजूनही पायाभूत सुविधांची कमतरता आहे. छत्रपती घराणे आणि चंदगड हे एक वेगळेच नाते आहे. चंदगडच्या समस्या सोडविण्यासाठी आपल्या हक्काचा माणूस दिल्लीत पाठण्याची गरज असून शाहू छत्रपती यांना विजयी करून आपण त्यांना दिल्लीला पाठवूया, असे आवाहन युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती यांनी केले.

Advertisement

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील इंडिया व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार शाहू महाराज छत्रपती यांच्या प्रचारार्थ युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती यांनी चंदगड तालुक्यातील आमरोळी, अलबादेवी, शिरोली, सत्तेवाडी, इब्राहिमपूर गावांचा दौरा केला. यावेळी गावागावांत महिलांनी, ग्रामस्थांनी मोठ्या आस्थेने त्यांचे स्वागत केले.

काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजीराव देसाई म्हणाले, काँग्रेसने सर्वसामान्य नागरिक, महिला, युवक, शेतकरी, कष्टकरी डोळ्यासमोर ठेवून जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. ज्या राज्यात काँग्रेसचे सरकार आहे तेथे सर्व निर्णयाची पूर्तता होत आहे. त्यामुळे जनतेचा विश्वास काँग्रेसवर आहे. आताच्या जाहीरनाम्यातील सर्व बाबींची पूर्तता होणारच ही काँग्रेसची गॅरंटी आहे. सर्वांनी आपापले बाहेरगावी असणारे मतदार घेऊन ताकदीने शाहू छत्रपती महाराजांच्या विजयासाठी प्रयत्न करावेत.

Advertisement

शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख अनिल दळवी म्हणाले, देशाला खर्या अर्थाने शिव-शाहुंच्या विचारांची गरज असून ठाकरेंचे शिवसैनिक प्रामाणिकपणे शाहू छत्रपती महाराजांना मताधिक्य देण्यासाठी राबणार आहेत.

या प्रचार दौऱ्यास शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष प्रा. सुनील शिंत्रे, विद्याधर गुरबे, राजश्री देसाई, विद्या विलास पाटील, माजी पंचायत समिती सदस्या रूपाताई खांडेकर, नंदिनी पाटील, शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख अनिल दळवी, शांता जाधव, नितीन पाटील, डॉ. विजयकुमार कांबळे, डॉ. सदानंद गावडे, अक्षय करंबळकर, सुरेश हरेर, विष्णू यादव, पिंटू मंडलिक, सरपंच प्रकाश वाईगडे, दशरथ वाईगडे, रघुनाथ भादवणकर, श्रीकांत नेवगे, सरपंच पांडुरंग देवलकर, माजी सरपंच अशोक देसाई, चंद्रकांत हावळ, मोहन पेडणेकर आदीसह कार्यकर्ते, महिला, ग्रामस्थ उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.