For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मुंबईविरुद्ध आज विजयी वाटचाल कायम ठेवण्याचे दिल्लीसमोर आव्हान

06:57 AM Apr 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
मुंबईविरुद्ध आज विजयी वाटचाल कायम ठेवण्याचे दिल्लीसमोर आव्हान
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

रिषभ पंतचा फलंदाजीतील शानदार फॉर्म आणि प्रेरणादायी नेतृत्व यांच्या जारावर पुनरागमन केलेल्या दिल्ली कॅपिटल्सचा सामना आज शनिवारी येथे सातत्याच्या अभावाने ग्रासलेल्या मुंबई इंडियन्सशी होणार असून यावेळी आयपीएलच्या गुणतालिकेतील आपली झेप चालू ठेवण्याचे लक्ष्य दिल्लीसमोर असेल. कॅपिटल्सने आतापर्यंत संमिश्र हंगामाचा सामना केला आहे, ज्यामध्ये त्यांनी चमक दाखविली आहे, पण त्याचबरोबर त्यांना लाजिरवाण्या पराभवांनाही सामोरे जावे लागले आहे.

पण गेल्या चार सामन्यांतील तीन विजयांमुळे दिल्लीला सहाव्या स्थानावर जाण्यास मदत झाली आहे आणि मुंबई इंडियन्सविऊद्ध विजय मिळविल्यास त्यांचा ‘प्ले ऑफ’मधील स्थानावरचा दावा मजबूत होईल. दुसरीकडे, नेहमीप्रमाणे खराब सुऊवातीनंतर मुंबईने त्यांच्या पुढील चार सामन्यांमध्ये तीन विजय मिळवून पुनरागमन केलेले असले, तरी राजस्थान रॉयल्सने नऊ गडी राखून केलेल्या सर्वसमावेशक पराभवामुळे त्यांची विजयी घोडदौड संपुष्टात आली. ते आठव्या स्थानावर आहेत आणि त्यांना आणखी पराभव परवडणारे नाहीत.

Advertisement

दिल्लीसाठी सर्वांत मोठी सकारात्मक बाब कर्णधार पंतचा फॉर्म असून तो प्रत्येक सामन्यागिणक सुधारत असल्याचे दिसून येते. यष्टिरक्षक म्हणूनही त्याची कामगिरी चांगली झाली आहे. बुधवारी गुजरात टायटन्सविऊद्धच्या सामन्यात विजय मिळवून देणारी नाबाद खेळी करताना तो त्याच्या नेहमीच्या लढाऊ स्वरुपात दिसला. संजू सॅमसन, दिनेश कार्तिक आणि इशान किशन हे दावेदार असूनही टी-20 विश्वचषकासाठीच्या भारतीय संघात स्थान मिळविण्याच्या शर्यतीत पंत आघाडीवर आहे असे असेच म्हणावे लागेल.

जॅक फ्रेझर-मॅकगर्कमध्ये दिल्लीला वरच्या फळीतील एक सक्षम फलंदाज सापडला आहे, जो पॉवरप्लेचा फायदा घेऊ शकतो. परंतु सलामीवीर पृथ्वी शॉकडून अधिक अपेक्षा आहेत. डेव्हिड वॉर्नरने मागील सामना गमावून शाई होपसाठी मार्ग मोकळा केला होता. पण होप त्या संधीचा फायदा घेऊ शकला नाही आणि अनुभवी ऑस्ट्रेलियन खेळाडूला संघात परत आणले जाऊ शकते. ट्रिस्टन स्टब्सने तो किती आक्रमक होऊ शकतो ते वेळोवेळी सिद्ध केले आहे. अक्षर पटेलने देखील गुजरातविरुद्ध आपले फलंदाजीचे कौशल्य दाखवले.

कुलदीप यादव आणि अक्षर या फिरकी जोडीने फारशा धावा दिलेल्या नसल्या, तरी दिल्लीच्या वेगवान गोलंदाजी विभागाने चांगली कामगिरी करण्याची गरज आहे. वेगवान गोलंदाज एन्रिक नॉर्टजेने सरासरी षटकामागे 13.36 धावा दिल्ला असून ती दिल्लीसाठी एक मोठी समस्या आहे. खलील अहमद, मुकेश कुमार आणि इशांत शर्मा या खेळाडूंना दुखापतींनी ग्रासले आहे, ज्यामुळे त्यांची कामगिरी सातत्यपूर्ण राहिलेली नाही. मोसमाच्या आरंभी मुंबईने त्यांच्याविरुद्ध 5 बाद 234 धावा काढल्या होत्या. त्यामुळे दिल्लीला आज सतर्क राहावे लागेल.

या हंगामात मुंबईच्या पुनगरामनाची सुऊवात दिल्लीविऊद्धच्या विजयाने झाली आणि पाच वेळचे विजेते आजच्या महत्त्वपूर्ण लढतीत त्याचीच पुनरावृत्ती घडविण्याची आशा बाळगून असतील. मुंबईसाठी रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांनी धावा केल्या आहेत, परंतु या फॉर्ममध्ये सातत्य दिसून आलेले नाही. टीम डेव्हिड, इशान किशन आणि कर्णधार हार्दिक पंड्या या त्रिकूटावर मोठे योगदान देण्याचा दबाव असेल. जसप्रीत बुमराह हा मुंबईचा उत्कृष्ट गोलंदाज राहिला असून त्याने 13 बळी मिळविले आहेत. गेराल्ड कोएत्झीने धावा दिल्या असल्या, तरी आठ सामन्यांत 12 बळी घेतले आहेत. पण हे दोन वेगवान गोलंदाज वगळता मुंबईच्या गोलंदाजीने निराशा केली आहे.

सामन्याची वेळ : सायंकाळी 7.30 वा.

Advertisement
Tags :

.