For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दिल्ली कोचिंग दुर्घटना तपास सीबीआयकडे

06:22 AM Aug 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
दिल्ली कोचिंग दुर्घटना तपास सीबीआयकडे
Advertisement

दिल्ली उच्च न्यायालयाचे निर्देश : पोलीस तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

दिल्लीतील ओल्ड राजेंद्र नगर कोचिंग अपघाताचा तपास दिल्ली उच्च न्यायालयाने सीबीआयकडे सोपवला आहे. शुक्रवारी झालेल्या सुनावणीत उच्च न्यायालयाने आतापर्यंतच्या तपासावर प्रश्न उपस्थित करत दिल्ली पोलिसांना चांगलेच फटकारले. जर तुम्हाला एमसीडीकडून फाईल मिळत नसेल तर तुम्ही त्यांच्या कार्यालयात जाऊन फाईल जप्त करा, असे न्यायालयाने म्हटले आहे. त्याचवेळी, न्यायालयाने एसयूव्ही चालकाच्या अटकेवर नाराजी व्यक्त करत “तुम्ही पावसाच्या पाण्याचे चलन काढले नाही हीच मोठी मेहरबानी केली” अशी टिप्पणी केली आहे.

Advertisement

दिल्ली उच्च न्यायालयात शुक्रवारी झालेल्या सुनावणीदरम्यान एमसीडी आयुक्त आणि स्थानिक डीसीपीही न्यायालयात उपस्थित होते. उच्च न्यायालयाने एमसीडीच्या अधिकाऱ्यांना सांडपाणी व्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तुम्ही या घटनेची शास्त्राsक्त पद्धतीने चौकशी करा आणि कोणत्याही प्रकारच्या तणावाखाली पडू नका, असे न्यायालयाने म्हटले आहे. परिस्थितीला सामोरे जावे लागेल. ज्या भागात ही घटना घडली त्या भागात जवळपास कोणतीही डेनेज व्यवस्था नव्हती आणि रस्ते नाल्यासारखे काम करत होते. यासोबतच रस्त्यावरून जाणाऱ्या व्यक्तीच्या अटकेवरही न्यायालयाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले. एसयूव्हीच्या ड्रायव्हरला अटकेवरून या अपघातावर दिल्ली उच्च न्यायालयाने तिखट भाष्य केले आहे. दिल्ली पोलिसांच्या आतापर्यंतच्या कारवाईवर असमाधानी असलेल्या न्यायालयाने काही संस्थांनी स्वत:ला कायद्यापेक्षा मोठे मानले, असे म्हटले आहे. दिल्ली पोलिसांच्या वतीने वकील संजय जैन हजर झाले. असे वाटत असेल तर आम्ही माफी मागतो असे ते म्हणाले.

‘एमसीडी ऑफिसमध्ये जाऊन फाईल ताब्यात घ्या’

एमसीडीकडून सविस्तर माहिती उपलब्ध होत नसल्यास तुम्ही त्यांच्या कार्यालयात जाऊन फाईल ताब्यात घ्या, असे न्यायालयाने सांगितले. कोणत्या प्रकारची हेराफेरी होऊ शकते हे देव जाणतो. पोलिसांवर खूप विश्वास आहे. मुले कशी बुडू शकतात? हे आम्हाला अजूनही समजले नाही असा सवालही न्यायालयाने उपस्थित केला.

‘आपल्याला एकमेकांशी मोकळेपणाने बोलावे लागेल’

दिल्ली उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायाधीश मनमोहन आणि न्यायमूर्ती तुषार राव गेडेला यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. यावर न्यायमूर्ती मनमोहन म्हणाले की, आम्ही येथे तोडगा शोधत आहोत. जेव्हा आपण एकमेकांशी मोकळेपणाने बोलतो तेव्हाच उपाय शोधता येतात. सांडपाणी व्यवस्थेचे काय? याला उत्तर देताना एमसीडीच्या वतीने वकील मनू चतुर्वेदी यांनी न्यायालयाला सांगितले की, आम्ही कारवाई केली आहे. नाल्यांची सफाई केली जात आहे. याचिकाकर्त्या संघटनेच्या वतीने वकील ऊद्र विक्रम सिंह यांनी बाजू मांडली.

Advertisement
Tags :

.