कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

दिल्ली कॅपिटल्स-केकेआर लढत आज

06:39 AM Apr 29, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सुधारित फलंदाजीने पराभव टाळण्याचे दिल्लीचे ध्येय तर घसरण रोखण्यास कर्णधार रहाणे प्रयत्नशील

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

मंगळवारी येथे यजमान दिल्ली कॅपिटल्स व कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात आयपीएलमधील लढत होणार असून मधल्या षटकांत सुधारित फलंदाजी करण्याचे उद्दिष्ट यजमान दिल्ली कॅपिटल्ससमोर असेल. सायंकाळी 7.30 वाजता सामन्याला सुरुवात होईल.

गेल्या चार सामन्यांत दिल्लीला दोन पराभव स्वीकारावे लागले आहेत. रविवारी त्यांना आरसीबीने हरविले होते. स्पर्धा शेवटच्या टप्प्यात पोहोचली असल्याने आणखी एक पराभव टाळण्याचाच त्यांचा प्रयत्न असेल. टॉप ऑर्डरमध्ये अभिषेक पोरेलने आक्रमक फलंदाजीची झलक दाखवली आहे. मात्र पुनरागमनाच्या सामन्यात झगडावे लागलेला त्याचा सहकारी फॅफ डु प्लेसिसला कोटलाच्या संथ स्वभावाशी लगेचच जुळवून घेण्याचा प्रयत्न करावा लागेल. केएल राहुल हा दिल्लीचा सर्वाधिक धावा जमविणारा फलंदाज असला तरी रविवारी त्याला स्पिनर्ससमोर धावांचा वेग वाढवता आला नव्हता. सुनील नरेन व वरुण चक्रवर्ती या दोन स्पिनर्सशी मुकाबला करण्यासाठी त्याला सज्ज व्हावे लागेल.

दर्जेदार स्पिनर्स ताफ्यात असल्याने केकेआर यजमानांसमोर कठीण आव्हान उभे करण्याची शक्यता आहे. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील केकेआर संघ पावसाचा व्यत्यय आलेल्या पंजाब किंग्सविरुद्धच्या कठीण सामन्यानंतर आत्मविश्वासाच्या बाबतीत थोडा खचला आहे. मध्यफळीत राहुलच्या एकट्याच्या खांद्यावरील ओझे कमी करण्यासाठी करुण नायरकडून भक्कम फलंदाजीची अपेक्षा केली जात आहे.  गोलंदाजीच्या विभागात दिल्लीचा कर्णधार अक्षर पटेलने आघाडीवर राहून नेतृत्व करताना दोन बळी मिळविले. मात्र त्याला इतरांकडून अपेक्षित साथ मिळाली नाही. स्टार वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कला आरसीबीविरुद्ध बळी मिळविण्यात यश आले नाही. पण यावेळी तो केकेआरच्या कमकुवत बाजूचा लाभ उठवण्याचा निश्चितच प्रयत्न करेल तर फसव्या गुगलीज टाकणारा कुलदीप यादव हा केकेआरसाठी मधल्या षटकांत धोकादायक ठरण्याची शक्यता आहे. आरसीबीविरुद्ध रविवारच्या सामन्यात दिल्लीचे क्षेत्ररक्षण मात्र गचाळ झाले. विजयी खेळी करणाऱ्या कृणाल पंड्याचा महत्त्वाच्या क्षणी पोरेलने झेल सोडला, तो त्यांना खूपच महाग पडला.

मात्र केकेआरने आतापर्यंत केवळ 7 गुण मिळविले असून ते सातव्या स्थानावर आहेत. गेल्या तीन सामन्यांत त्यांना एकही गुण मिळविता आलेला नाही. त्यापैकी दोन सामने त्यांनी गमविले तर एका सामन्याचा निकाल लागला नाही. ही घसरण थांबवून प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवण्यासाठी कर्णधार रहाणे आतुर झाला आहे. आणखी एक पराभव झाल्यास त्यांचा मार्ग आणखी खडतर होणार आहे. विविध विभागात केकेआरला समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यांची फलंदाजी सेटल झालेली वाटत नाही. क्विन्टन डी कॉक व रहमानुल्लाह गुरबाज या सलामीवीरांना सुनील नरेनसमवेत रोटेट करावे लागले आहे तर धावांसाठी हा संघ रहाणे व अंगकृश रघुवंशी यांच्यावरच मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. मध्यफळीत वेंकटेश अय्यर, आंद्रे रसेल, रिंकू सिंग व रमनदीप सिंग प्रभावी कामगिरी करण्यात अपयशी ठरले आहेत.

निष्प्रभ गोलंदाज हा केकेआरचा आणखी एक चिंतेचा विषय आहे. त्यांना ओपनिंग भागीदारी फोडण्यात अपयशच आले असल्याने प्रतिस्पर्धी संघ मोठी धावसंख्या रचू लागले आहेत. आरसीबीने गेल्या सामन्यात 120 धावांची सलामी दिली होती. डेथ ओव्हर्समध्ये केकेआरने थेडेफार नियंत्रण मिळविले असले तरी चक्रवर्ती, वैभव अरोरा, हर्षित राणा यांना दिल्लीविरुद्ध धावांचा ओघ रोखण्यासाठी सामूहिक प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.

संघ : दिल्ली कॅपिटल्स : अक्षर पटेल (कर्णधार), जेक फ्रेजर मॅकगर्क, अभिषेक पोरेल, करुण नायर, केएल राहुल, ट्रिस्टन स्टब्स, आशुतोष शर्मा, विपराज निगम, स्टार्क, कुलदीप यादव, मोहित शर्मा, मुकेश कुमार, समीर रिझवी, दर्शन नलकांडे, डोनेव्हन फेरेरा, त्रिपुराना विजय, दुश्मंता चमीरा, फॅफ डु प्लेसिस, टी. नटराजन, अजय जाधव मंडल, मन्वंत कुमार एल., माधव तिवारी.

केकेआर : अजिंक्य रहाणे (कर्णधार), रिंकू सिंग, क्विन्टन डी कॉक, रहमानुल्लाह गुरबाज, ए. रघुवंशी, रोव्हमन पॉवेल, मनीष पांडे, लवनित सिसोदिया, वेंकटेश अय्यर, अनुकूल रॉय, मोईन अली, रमनदीप सिंग, आंद्रे रसेल, अन्रिच नॉर्त्जे, वैभव अरोरा, मयांक मार्कंडे, स्पेन्सर जॉन्सन, हर्षित राणा, सुनील नरेन, वरुण चक्रवर्ती, चेतन साकारिया.

सामन्याची वेळ : सायंकाळी 7.30 पासून.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official
Next Article