दिल्ली, बंगाल विजयी
वृत्तसंस्था/ रांची
हॉकी इंडियाच्या येथे सुरु असलेल्या 14 व्या कनिष्ठ महिलांच्या राष्ट्रीय हॉकी चॅम्पियनशिप स्पर्धेत दिल्ली आणि बंगाल महिला हॉकी संघांनी प्राथमिक गटातील आपले शेवटचे सामने जिंकले पण त्यांना उपांत्यपूर्व फेरीपासून वंचित व्हावे लागले.
या स्पर्धेत मध्य प्रदेश-उत्तर प्रदेश, झारखंड-महाराष्ट्र, हरियाणा-पंजाब, छत्तीसगड-ओडीशा अशा उपांत्यपूर्व फेरीच्या लढती होतील. दिल्लीने पुडुचेरीचा 2-1 अशा गोलफरकाने पराभव केला. दिल्लीतर्फे पूजा आणि अंशिका यांनी प्रत्येकी 1 गोल तर पुडुचेरीतर्फे रियाने 1 गोल नोंदविला. इ गटातील शेवटच्या सामन्यात बंगालने बिहारचा 9-1 असा एकतर्फी पराभव केला. बंगालच्या होरो सेलेस्टिनाने 4 तर झेड लालडिंटलुआंगाने 2 गोल नोंदविले. याशिवाय कर्णधार सुबिला तिर्की, एक्का जमुना व शिवानी कुमारी यांनी एकेक गोल केले. बिहारतर्फे फेन्सी खातूनने एकमेव गोल केला.