For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नोंदी हटवा, वक्फ बोर्ड रद्द करा

10:59 AM Nov 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
नोंदी हटवा  वक्फ बोर्ड रद्द करा
Advertisement

भाजपतर्फे सरकारविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

Advertisement

बेळगाव : शेतकरी कसत असलेल्या जमिनींवर वक्फ बोर्डाच्या नोंदी आढळून आल्या आहेत. वर्षानुवर्षे शेतकऱ्यांचा हक्क असलेल्या जमिनींवर आता वक्फ बोर्डाच्या नोंदी आढळल्या असून याला सर्वस्वी राज्यातील काँग्रस सरकार जबाबदार आहे. त्यामुळे वक्फ बोर्डाच्या नोंदणी हटवून वक्फ बोर्ड रद्द करण्यात यावा, या मागणीसाठी सोमवारी भाजपच्यावतीने जोरदार आंदोलन करण्यात आले. वक्फ बोर्डच्या जमिनी प्रकरणावरून मागील आठवडाभरापासून सरकारवर टीका होत होती. वक्फ बोर्डमुळे अनेक शेतकऱ्यांना भूमीहीन होण्याची वेळ आली आहे. अनेक वर्षे कसत असलेल्या जमिनींवरही वक्फ बोर्डने दावा केल्यामुळे शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

बेळगाव जिल्ह्यातही अशा घटना घडल्या असल्याने त्या त्वरित थांबविण्याची मागणी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आली. चन्नम्मा चौकात सिद्धरामय्या सरकारविरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढून निवेदन सादर करण्यात आले. लवकरात लवकर वक्फ बोर्डच्या नोंदी न हटविल्यास आक्रमक आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. तसेच मंत्री जमीर अहमद यांचा तात्काळ राजीनामा घेण्याची मागणी करण्यात आली. यावेळी माजी आमदार अनिल बेनके, माजी आमदार संजय पाटील, माजी विधान परिषद सदस्य महांतेश कवटगीमठ, माजी मंत्री मुरुगेश निराणी, डॉ. सोनाली सरनोबत, भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील, धनंजय पाटील यासह भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.