वीज ग्राहक संघटनेच्या शिष्टमंडळाची कार्यकारी अभियंत्यांच्या कार्यालयावर धडक
अधिकाऱ्यांवर केली प्रश्नांची सरबत्ती
सावंतवाडी । प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवकाळी झालेल्या पावसात वीज पुरवठ्याची ऐशी तैशी जनतेने अनुभवली आहे. याला वीज वितरणचे ठेकेदार सर्वस्वी जबाबदार आहेत तसेच वीज अधिकारी , कर्मचारी यांनी दक्षतेने काम करायला हवे . पुढील कालावधीत अशी स्थिती उद्भभवता नये या दृष्टीने आतापासूनच उपाययोजना करा. सिंधुदुर्ग जिल्ह्यात इलेक्ट्रॉनिक मीटर कोठेही बसवले जाऊ नयेत . जुने मीटरच कायम ठेवावेत. कंत्राटी तत्वावर असलेल्या वायरमनचे पगार भरभक्कम करावेत तसेच ओळखपत्र व ड्रेस कोड निश्चित करावा अशा विविध मागण्या जिल्हा विज ग्राहक संघटनेच्या शिष्टमंडळाने कुडाळ येथे वीज वितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयाला धडक देत कार्यकारी अभियंत्यांवर प्रश्नांचा भडिमारही केला. वीज ग्राहक संघटनेच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष संजय लाड, समन्वयक नंदन वेंगुर्लेकर यांनी केले. यावेळी जिल्हा सचिव दीपक पटेकर ,महेश खानोलकर, सेवानिवृत्त उपविभागीय पोलीस अधिकारी दयानंद गवस, वेंगुर्ले तालुका अध्यक्ष संजय गावडे ,जयराम वायंगणकर,कणकवली ,गुरुनाथ कुलकर्णी ,संतोष नाईक,चंद्रकांत जाधव, नारायण जाधव, प्रसाद मांजरेकर ,तुकाराम म्हापसेकर, समीर शिंदे ,आनंद नाईक, वसंत धुरी ,प्रणय बांदिवडेकर , वाल्मिकी कुबल ,ज्ञानेश्वर जाधव ,अनुज पडवळ, आनंद देवळी, वसंत धुरी आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थित वीज ग्राहक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी वीज अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबती करत यापुढे तुमच्या कामात सुधारणा करा. वीज ग्राहकांचे कोणतेही हाल यापुढे होता कामा नये या दृष्टीने आतापासूनच तुमची उपायोजना करा असे स्पष्ट केले. यावेळी सेवानिवृत्त उपविभागीय पोलीस अधिकारी दयानंद गवस यांनी वीज वितरणच्या कार्यकारी अभियंता श्री वनमोरे यांना चांगलेच धारेवर धरले. तुम्ही पावसाळा सुरू होण्याअगोदर कुठल्याच उपयोजना का केल्या नाहीत . गेले पंधरा दिवस या जिल्ह्यात पावसाळी वातावरण होते. त्यावेळी तुमची लाईट वारंवार जात होती. जनता हैराण झाली. हे असे किती दिवस चालणार आहे. तुम्ही तुमच्या कामात सुधारणा करा असे स्पष्ट केले तर जिल्हाध्यक्ष संजय लाड यांनी आम्ही गेले दोन वर्ष वीज वितरणच्या एकंदरीत कारभाराबाबत वारंवार लक्ष वेधले आहे.