कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह 5 रोजी गोव्याच्या दौऱ्यावर

10:53 AM Mar 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पणजी : केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे मंगळवार दि. 5 मार्च रोजी गोव्यात येणार असून आयएनएस मांडवी येथे नव्याने बांधण्यात आलेल्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन करणार आहेत. ‘नेव्हल वॉर कॉलेज’ या नावाने ती इमारत उभारण्यात आली आहे. कमांडंट रिअर अॅडमिरल अर्जुन देव नायर यांनी दिलेल्या माहितीनुसार त्या इमारतीमध्ये तिन्ही सशस्त्र दलांतील सेवेसाठी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. गोव्यातील नौदलाची सदर इमारत देशासाठी महत्त्वाची ठरणार असून प्रमुख, उच्च पदस्थ अधिकाऱ्यांना येथे प्रशिक्षण मिळणार आहे. तिन्ही दलांतील काही निवडक अधिकारी सदर उद्घाटन कार्यक्रमास उपस्थित राहाणार आहेत. नौदलातर्फे हा कार्यक्रम आखण्यात आला असून त्याची तयारी करण्यात येत आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article