संसदेत झालेल्या गोंधळानंतर संरक्षणमंत्र्यांनी सर्व खासदारांना केले आवाहन
संसद सभागृहात बुधवारी झालेल्या गोंधळानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.यासाठी मोठा पोलीस आणि सुरक्षा दल तैनात करण्यात आला आहे. इतकाच नाही तर संसद परिसरातून जाणाऱ्या प्रत्येक वाहनाची आणि व्यक्तीची सुरक्षा दल कसून तपासणी करत आहे. दरम्यान संरक्षणमंत्र्यांनीही आज लोकसभा सभागृहात बोलताना सर्व खासदारांना महत्त्वाचे आवाहन केले आहे.
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी संसदेत याविषयी बोलताना सर्वच पक्षाच्या खासदारांना आवाहन केलं. खासदारांकडून पास दिले जात असताना, ज्या व्यक्तींसाठी आपण पास देत आहोत, ती व्यक्ती सभागृहा कुठलाही अनुचित प्रकार करणार नाही, घडवणार नाही, याची खात्री करुनच पास द्यायला हवा, असे राजनाथसिंह यांनी म्हटले. तसेच, घडलेल्या घटनेचा देशभरातून निषेध होत आहे, लोकसभा अध्यक्षांनीही चौकशीचे आदेश दिले आहेत. मात्र, सर्वच खासदारांनी जबाबदारीने आणि काळजीने पासचं वाटप केलं पाहिजे, असेही सिंह यांनी म्हटले आहे.