For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बचावपटू संदेश झिंगन पुनरागमनास सिद्ध

06:49 AM Nov 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
बचावपटू संदेश झिंगन पुनरागमनास सिद्ध
Advertisement

मलेशियाविरुद्ध मित्रत्वाच्या सामन्यासाठी संभाव्य खेळाडू जाहीर, इरफान यादवदलाही स्थान

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

जानेवारीपासून गुडघ्याच्या दुखापतीमुळे मैदानाबाहेर असलेला भारताचा बचावपटू संदेश झिंगन पुनरागमनासाठी सज्ज झाला आहे. मंगळवारी 18 नोव्हेंबर रोजी मलेशियाविऊद्धच्या मायदेशी मैदानावरील मित्रत्वाच्या सामन्यासाठी निवडलेल्या 26 संभाव्य सदस्यांच्या यादीत त्याचे नाव आहे. हैदराबाद येथे हा सामना खेळविला जाणार आहे. झिंगनला दुखापतीमुळे आशियाई चषक आणि उर्वरित आयएसएल मोसमात खेळता आले नव्हते.

Advertisement

आशियाई चषक स्पर्धेतील सीरियाविऊद्धच्या भारताच्या सामन्याच्या पहिल्या सत्रात ‘एफसी गोवा’च्या या सेंटर बॅकच्या उजव्या गुडघ्याला दुखापत झाली होती, ज्यामुळे त्याला स्पर्धेतून बाहेर पडावे लागले होते. आता तो पूर्णपणे बरा झाला असून त्याच्या पुनरागमनामुळे भारताचा बचाव मजबूत होईल अशी अपेक्षा आहे. भारताचे मुख्य प्रशिक्षक मानोलो मार्केझ यांनी जुलैमध्ये इगोर स्टिमॅचकडून पदभार स्वीकारल्यानंतर संघ अजूनही पहिल्या विजयाच्या शोधात आहे. त्यांनी ‘चेन्नईन एफसी’चा फॉरवर्ड इरफान यादवदला देखील प्रथमच राष्ट्रीय संघात स्थान दिले आहे.

सदर 23 वर्षीय खेळाडूने या मोसमात प्रशिक्षक ओवेन कोयल यांच्या मार्गदर्शनाखाली सात सामन्यांत एक गोल आणि दोन गोलांसाठी साहाय्य करून लक्ष वेधून घेतले आहे. यादवदचा वरिष्ठ सहकारी फाऊख चौधरी यानेही संघातील आपले स्थान कायम ठेवले आहे. याव्यतिरिक्त मोहन बागानचे अनिऊद्ध थापा आणि लालेंगमाविया राल्टे (अपुया), नॉर्थ ईस्ट युनायटेड एफसीचा जितीन एम. एस. आणि केरळ ब्लास्टर्स एफसीचा विबिन मोहनन यांना संघात परत बोलावण्यात आले आहे.

मुंबई सिटी एफसीचा हमिंगथनमाविया राल्ते (वाल्पुया) आणि बेंगळूर एफसीचा राहुल भेके हे देखील भारताची बॅकलाइन मजबूत करण्यासाठी पुनरागमन करतील. 12 ऑक्टोबर रोजी झालेल्या मागील सामन्यात भारताने व्हिएतनामशी 1-1 अशी बरोबरी साधली होती.

भारताचा संभाव्य संघ-गोलरक्षक : अमरिंदर सिंग, गुरप्रीतसिंग संधू आणि विशाल कैथ. बचावपटू : आकाश सांगवान, अन्वर अली, आशिष राय, चिंगलेनसाना सिंग कोनशाम, हमिंगथनमाविया राल्ते, मेहताब सिंग, राहुल भेके, रोशन सिंग नौरेम आणि संदेश झिंगन. मिडफिल्डर : अनिऊद्ध थापा, ब्रँडन फर्नांडिस, जॅक्सन सिंग थौनाओजम, जितीन एम. एस., लालेंगमाविया राल्ते, लिस्टन कुलासो, सुरेश सिंग वांगजाम आणि विबिन मोहनन. आघाडीपटू: एडमंड लालरिंदिका, इरफान यादवद, फाऊख चौधरी, लालियांझुआला छांगटे, मनवीर सिंग आणि विक्रम प्रताप सिंग.

Advertisement
Tags :

.