For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ऑल इंग्लंडच्या सेमीफायनलमध्ये लक्ष्य सेन पराभूत

06:18 AM Mar 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
ऑल इंग्लंडच्या सेमीफायनलमध्ये लक्ष्य सेन पराभूत
Advertisement

वृत्तसंस्था/ लंडन

Advertisement

प्रतिष्ठेच्या ‘ऑल इंग्लंड ओपन’ बॅडमिंटन स्पर्धेतील भारताचे आव्हान संपुष्टात आले आहे. भारताचा स्टार खेळाडू लक्ष्य सेन पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत पराभूत झाला. लक्ष्यच्या पराभवासह तब्बल 23 वर्षापासूनचे इंग्लंड ओपन बॅडमिंटन स्पर्धा जिंकण्याचं भारतीय खेळाडूचे स्वप्न पुन्हा भंगले आहे.

इंडोनेशियाच्या जोनाथन ख्रिस्टीने लक्ष्य सेनचा 21-12, 10-21, 21-15 असा पराभव केला. या विजयानंतर ख्रिस्टीने स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. लक्ष्य सेनला ख्रिस्टीविरुद्ध पहिल्या सेटमध्ये 21-12 असा पराभव पत्कारावा लागला. मात्र दुसऱ्या गेममध्ये त्याने शानदार पुनरागमन केले. या गेममध्ये लक्ष्यने इंडोनेशियन खेळाडूला 21-10 असे नमवले. यानंतर तिसऱ्या गेममध्ये मात्र ख्रिस्टीने जोरदार पुनरागमन करत हा गेम 21-15 असा जिंकला व आपले अंतिम फेरीतील स्थान निश्चित केले.

Advertisement

ऑल इंग्लंड ओपन ही बॅडमिंटन मधील सर्वात प्रतिष्ठेची स्पर्धा मानली जाते. आतापर्यंत केवळ दोन भारतीयांना ही स्पर्धा जिंकता आली आहे. दिग्गज बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोण यांनी 1980 मध्ये पहिल्यांदा विजेतेपद पटकावले होते तर 2001 मध्ये पुलेला गोपीचंद यांनी ही स्पर्धा जिंकली होती. मात्र त्यानंतर एकाही भारतीयाला ही स्पर्धा जिंकता आलेली नाही. लक्ष्यने 2022 मध्ये या स्पर्धेचे उपजेतेपद पटकावले होते. यंदा त्याला विजेतेपदाची नामी संधी होती पण त्याला निराशा पत्करावी लागली.

Advertisement
Tags :

.