बांदेश्वर मंदिरात २ डिसेंबरला दीपोत्सवाचे आयोजन
01:02 PM Dec 01, 2024 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement
प्रतिनिधी
बांदा
Advertisement
दरवर्षीप्रमाणे देव दीपावली निमित्त येथील जागृत देवस्थान असलेल्या श्री देव बांदेश्वर भूमिका मंदिर व परिसरात सोमवार दिनांक २ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी भाविकांना पणत्या तेल उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाल्यानंतर दीपोत्सव साजरा करण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त भाविकांनी दीप प्रज्वलीत करून दीपोत्सव कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री बांदेश्वर भूमिका देवस्थान समितीचे अध्यक्ष राजाराम उर्फ बाळु सावंत यांनी केले आहे.
Advertisement
Advertisement