For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दीपिकाच्या डचविऊद्धच्या शानदार गोलला नामांकन

06:31 AM Jul 07, 2025 IST | Tarun Bharat Portal
दीपिकाच्या डचविऊद्धच्या शानदार गोलला नामांकन
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

भारतीय महिला हॉकी संघाची फॉरवर्ड दीपिका हिला 2024-25 एफआयएच हॉकी प्रो लीग हंगामातील जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या नेदरलँड्सविऊद्ध सामन्यात अविश्वसनीय अशा एकट्याच्या प्रयत्नावर केलेल्या फील्ड गोलमुळे पॉलिग्रास मॅजिक स्किल पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे.

2024-25 एफआयएच हॉकी प्रो लीग हंगामासाठीच्या पॉलिग्रास मॅजिक स्किल पुरस्कारासाठी नामांकन जाहीर झाले असून मतदान करण्याची अंतिम मुदत भारतीय प्रमाण वेळेनुसार 14 जुलै रोजी पहाटे 3.29 पर्यंत आहे. जगभरातील हॉकी चाहते हंगामात कोणाचा क्षण सर्वोत्तम राहिला आणि कोणाचा गोल सर्वोत्तम होता याच्या आधारे विजेता ठरवतात. दीपिकाचा हा प्रतिष्ठित क्षण फेब्रुवारी, 2025 मध्ये प्रो लीगच्या भुवनेश्वर टप्प्यादरम्यान नोंदविला गेला. यावेळी कलिंगा स्टेडियमवर 2-2 अशा बरोबरीनंतर भारताने नेदरलँड्सचा शूटआउटमध्ये पराभव केला.

Advertisement

35 व्या मिनिटाला दीपिकाने एक अद्भूत फील्ड गोल केला, जेव्हा भारत दोन गोलांनी पिछाडीवर होता. दीपिकाने डाव्या बाजूने उत्कृष्टपणे ड्रिबलिंग करत नेदरलँड्सच्या बचावफळीला भेदले, बेसलाईनपर्यंत ती पोहोचली आणि डिफेंडरच्या काठीवरून चेंडू काढत शेवटी तो जाळ्यात टाकून एका विलक्षण गोलाची नोंद केली. ‘नेदरलँड्सविऊद्धचा तो गोल माझ्या कारकिर्दीतील सर्वांत खास क्षणांपैकी एक आहे. सर्व काही अगदी सहज झाले आणि त्यामुळे आम्हाला बरोबरी साधण्यास आणि शूटआउटमध्ये सामना जिंकण्यास मदत झाली. मला पॉलीग्रास मॅजिक स्किल अवॉर्डसाठी नामांकन मिळाल्याचा अभिमान आहे आणि आमच्या चाहत्यांच्या पाठिंब्याबद्दल मी आभारी आहे. अशा क्षणांसाठी आम्ही खूप कठोर सराव करतो’, असे दीपिकाने म्हटले आहे.

Advertisement
Tags :

.