कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

दीपिका, पार्थ साळुंखे वैयक्तिक रिकर्व्हच्या उपांत्य फेरीत

06:22 AM May 10, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मिश्र कंपाऊंडमध्ये मधुरा-अभिषेकला कांस्य जिंकण्याची संधी

Advertisement

वृत्तसंस्था/ शांघाय, चीन

Advertisement

भारताच्या कंपाऊंड मिश्र सांघिक तिरंदाजी संघाने येथे सुरू असलेल्या वर्ल्ड कप स्टेज 2 तिरंदाजी स्पर्धेत कांस्यपदकाच्या लढतीत प्रवेश मिळविला तर दीपिका कुमारी व पार्थ सुशांत साळुंखे यांनी महिला व पुरुष वैयक्तिक रिकर्व्ह प्रकारात उपांत्य फेरी गाठली.

कंपाऊंड मिश्र सांघिक प्रकारात मधुरा धामणगावकर व अभिषेक वर्मा यांना ग्रेट ब्रिटनच्या इला गिब्सन व अजय स्कॉट यांच्याकडून 156-158 अशा फरकाने पराभूत झाल्या. भारतीय जोडीने पहिली व तिसरी मालिका 38-39, 39-40 अशी गमवली तर दुसरी व चौथी मालिका 40-40, 39-39 अशी टाय झाली होती. मधुरा व अभिषेक यांना आता मलेशियाच्या जोडीशी कांस्यपदकासाठी लढावे लागेल. मलेशियाने तुर्कीयेचा 156-157 असा पराभव करून कांस्यपदकाच्या फेरीत स्थान मिळविले आहे.

वैयक्तिक पुरुष व महिला रिकर्व्ह स्पर्धेत साळुंखेने टोकियो ऑलिम्पिक सुवर्णविजेता व पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतील कांस्यविजेता मेटो गॅझोझला पहिल्या फेरीत शूटऑफमध्ये 6-5 असा पराभवाचा धक्का दिला. त्यानंतर दुसऱ्या फेरीत त्याने जपानच्या आओशिमा तेत्सुयावरही याच फरकाने मात केली. त्यानंतरच्या फेरीत त्याने ऑस्ट्रेलियाच्या रेयान टायाकवर 6-2 अशा फरकाने मात केली. उपांत्यपूर्व फेरीत साळुंखेने दक्षिण कोरियाच्या किम जे डेओकचा 6-2 असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली. त्याची पुढील लढत दक्षिण कोरियाच्या किम वुजिनशी होईल. वुजिन हा पॅरिस ऑलिम्पिकचा सुवर्णविजेता आहे. वुजिनने भारताच्या अतानू दासचा उपांत्यपूर्व फेरीत पराभव केला.

महिला विभागातील वैयक्तिक रिकर्व्हमध्ये दीपिका कुमारीने स्पेनच्या लुसिया इबानेझ रोमेरोवर 6-4 असा विजय मिळवित सुरुवात केली. त्यानंतर कझाकच्या डायना तुर्सुनबेकचा 6-0 असा एकतर्फी धुव्वा उडविला तर फ्रान्सच्या क्हिक्टोरिया सेबॅस्टियनचा 6-4 असा पराभव केल्यानंतर उपांत्यपूर्व फेरीत चीनच्या लि जियामनवर 6-2 अशी मात करीत उपांत्य फेरी गाठली. उपांत्य फेरीत तिची लढत द.कोरियाच्या लिम सिह्योऑनशी होईल. सिह्योऑनने भारताच्या अंकिता भगतचा उपउपांत्यपूर्व फेरीत पराभव केला.

रिकर्व्ह मिश्र सांघिक प्रकारात दीपिका व धीरज बोम्मदेवरा यांना दुसऱ्या फेरीत स्पेनच्या इलिया कॅनालेस व आंद्रेस टेमिनो मेडायल यांच्याकडून 1-5 असा पराभव स्वीकारावा लागला. शनिवारी भारताचे महिला व पुरुष कंपाऊंड संघ सुवर्णपदकासाठी मेक्सिकोविरुद्ध लढणार आहेत.

 

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article